scorecardresearch

Premium

Video: शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

अभिनेते अविनाश नारकरांना हा नवा व्हिडीओ पाहा…

marathi actor Avinash Narkar
अभिनेते अविनाश नारकरांना 'हा' नवा व्हिडीओ पाहा…

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ प्रदर्शित होऊन १९ दिवस पूर्ण झालेत, तरी देखील अजूनही चित्रपटाची क्रेझ सगळीकडे पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे. दुसऱ्याबाजूला सोशल मीडियावर ‘जवान’ चित्रपटातील गाणी ट्रेंडिंगला आहेत. तसेच चित्रपटातील शाहरुखचा लूक रिक्रिएट करून व्हिडीओ केले जात आहेत. यामध्ये कलाकार मंडळींचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वी ‘चलेया’ या गाण्यावरील पृथ्वीक प्रताप आणि प्रियदर्शनी इंदलकरचा जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता याच गाण्यावरील अभिनेते अविनाश नारकर यांचा डान्स व्हिडीओ चर्चेत आला आहे.

हेही वाचा – रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकणार बॉबी देओल; त्याचा जबरदस्त लूक पाहून चाहते म्हणाले, “सिस्टम हँग केलं…”

surbhi
“आजवर छेड काढणाऱ्या ४ पोरांना धुतलंय…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “शाळेत असताना…”
kranti redkar and sameer wankhede twins daughters
Video: “माझे बाबा शंकर भगवान अन् आई…” क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल
marathi actor ashok saraf
Video: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर अशोक सराफ झाले भावुक; नक्की काय घडलं? पाहा
Bigg boss marathi fame Utkarsh Shinde
“जिच्या पायाला मी स्पर्श करून…” उत्कर्ष शिंदेची अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी खास पोस्ट, म्हणाला…

सोशल मीडियावर अधिक सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी अविनाश नारकर एक आहेत. अविनाश नारकर नेहमी नवनवीन मजेशीर व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असतात. यामुळे ते कित्येदा ट्रोल देखील झाले आहेत. पण याकडे दुर्लक्ष करून ते मजेशीर व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.

हेही वाचा – “मनमोहन सिंगांनी निधड्या छातीनं…”, किरण मानेंनी माजी पंतप्रधानांसाठी केली पोस्ट; म्हणाले, “मरणाच्या दारात…”

नुकताच त्यांनी ‘चलेया’ या शाहरुखच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. या गाण्याची हूक स्टेप ते करताना दिसत आहेत. या व्हिडीओत, अविनाश यांच्याबरोबर ‘कन्यादान’ मालिकेतील कलाकार देखील पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Video: करण कुंद्राने नव्या घरात केला गृहप्रवेश; पाहा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घराची पहिली झलक

हेही वाचा – Video: “जगातलं अंतिम सत्य”; प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

दरम्यान, अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. शिवाय ते ‘झी मराठी’वरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेतही काम करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor avinash narkar dance on shahrukh khan chaleya song from jawan pps

First published on: 26-09-2023 at 18:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×