Premium

“मला माझी जन्मतारीख माहीत नाही”, ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडचा खुलासा, म्हणाला, “ससून रुग्णालयात…”

“माझा जन्म झाला तेव्हा…”, किरण गायकवाडचं वक्तव्य चर्चेत

kiran-gaikwad
किरण गायकवाडचं वक्तव्य चर्चेत. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

किरण गायकवाड हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘लागिर झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या किरणने अल्पावधीतच मनोरंजनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळवून दिली. आता चौक या सिनेमातून किरण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘चौक’ सिनेमाच्या निमित्ताने किरणने आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना त्याने अगदी गमतीशीर उत्तरं दिली. किरणने या मुलाखतीत जन्मतारीख माहीत नसल्याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “एखाद्या चित्रपटाला साजेशी अशीच माझी गोष्ट आहे. म्हणून मी इन्स्टाग्रामच्या बायोमध्येही कहानी पूरी फिल्मी है असं लिहलं आहे. मला माझी जन्मतारीख माहिती नाही.”

हेही वाचा>> “सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि…”, परिणीती चोप्रासाठी राघव चड्ढा यांची खास पोस्ट

किरणने या मुलाखतीत जन्मतारीख ठाऊक नसण्यामागचं कारणंही सांगितलं. “माझा जन्म घरी झाला. घरात मुलगा झाला म्हणून बाबा एक-दोन आठवडे जल्लोषात होते. आई निरक्षर असल्यामुळे तिनेही कुठे नोंद केली नाही. शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्मतारखेचा दाखला लागतो. त्यासाठी मग मी आणि आई ससून रुग्णालयात गेलो. तिथून मी जन्माचा दाखला आणला. त्यावर एक तारीख लिहावी लागते म्हणून १२ जून टाकण्यात आली. त्यामुळे माझं नक्षत्र, जन्मतारीख याबद्दल मला काहीच माहीत नाही,” असंही पुढे किरण म्हणाला.

हेही वाचा>> GT vs RCB : मॅचमध्ये शतक झळकावल्यानंतर शुबमन गिलने शेअर केली पोस्ट, प्रसिद्ध मराठी अभिनेता कमेंट करत म्हणाला…

‘चौक’ सिनेमात किरण महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. १९ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, शुभांकर एकबोटे, उपेंद्र लिमये हे कलाकारही दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor kiran gaikwad revealed he dont know his birth date know the reason kak

First published on: 22-05-2023 at 14:20 IST
Next Story
GT vs RCB : मॅचमध्ये शतक झळकावल्यानंतर शुबमन गिलने शेअर केली पोस्ट, प्रसिद्ध मराठी अभिनेता कमेंट करत म्हणाला…