मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने हे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे सातत्याने प्रसिद्धीझोतात आहेत. बिग बॉसच्या घरातून आल्यानंतर किरण माने हे विविध प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. सध्या किरण माने हे गोव्यात फिरायला गेले आहेत. यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
किरण मानेंनी तल्लख बुद्धीच्या जोरावर ‘बिग बॉस’च्या खेळात डावपेच आखत टॉप ५ मध्ये त्यांचं स्थान निश्चित केलं होतं. पण ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. किरण माने हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच किरण माने हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटींग करण्यासाठी गोव्याला गेले आहेत. त्यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
आणखी वाचा : “माझे नखरे बघून अशोक सराफ यांनी…” ‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्धची ‘ती’ पोस्ट चर्चेत
यातील पहिल्या फोटोत किरण माने हे बीचवर सेल्फी घेताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते गोव्याच्या समुद्र किनाऱ्याचा आनंद घेताना दिसत आहेत. तसेच इतर दोन फोटो ते बीचवर बसून गोव्याचा आनंद घेत आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.
“गोवा ! प्रसन्न सुर्योदय… भन्नाट, नादखुळा बीच…आणि थोड्याच वेळात लाईट – कॅमेरा – ॲक्शन. एकतर शुटिंगसाठी गोव्यात येणं म्हणजे निव्वळ सुख. त्यात सीन असाय की मी बीचवर बीयर पीत पहुडलोय… मज्जा !” असे कॅप्शन किरण मानेंनी दिले आहे.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : “आज या किरण्याला हरण्याच्या…” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
किरण मानेंनी केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करत चित्रपटाचे नाव विचारताना दिसत आहेत. पण अद्याप त्यांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.