Premium

“छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर…” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘रावरंभा’ चित्रपट पाहिल्यानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट, म्हणाला “मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा, पण…”

kushal badrike raavrambha
कुशल बद्रिके

छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य उभे करताना निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची मोलाची साथ लाभली. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. यावर आधारित असलेला रावरंभा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक संमिश्र प्रतिसाद देताना दिसत आहेत. नुकतंच या चित्रपटातबद्दल अभिनेता कुशल बद्रिकेने पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुशल बद्रिके हा ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. या ऐतिहासिक चित्रपटात क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत तो झळकत आहे. नुकतंच त्याने या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे…” ‘रावरंभा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कुशल बद्रिकेची पोस्ट

“मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा “तानाजी मालुसरे” आधी कळायला हवा. मुलांना स्पार्टन-३०० ची गोष्ट कळायला हवी, पण पावनखिंडीवर बाजीप्रभू देशपांडेंसह प्राणांची आहुती देणारे “३०० मावळे” आधी कळायला हवेत. लढाई जिंकून देणारा महाबली हल्क मुलांना माहित हवा, पण शौर्य आणि इमान यांच दुसरं नाव असलेले सरसेनापती “हंबीरराव मोहिते” आधी कळायला हवेत.
आयर्न मॅन ची गोष्ट मुलांना आपण सांगायलाच हवी, पण लोखंडाच्या सळ्यांनी डोळ्यांच्या खाचा झाल्या तरीही एकही हुंदका न देणारे आपले “छत्रपती संभाजी राजे” आधी कळायला हवेत. कॅप्टन अमेरिकेच्या नेतृत्वाला लाजवील असं आपल्या “छत्रपती शिवाजी महाराजांचं” नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर रक्तात भिनायला हवं. आपले सुपरहिरोज मुलांना आधी कळायला हवेत.
यावेळी आम्ही घेऊन आलोय आपल्या अशाच “7सुपरहिरो” ची कहाणी…. वेडात दौडलेल्या त्या “सात वीरांची” गोष्ट
सरसेनापती “प्रतापराव गुजर” आणि सोबतीच्या “सहा मावळ्यांची” गोष्ट, मुलांना ही गोष्ट बघायला नक्की घेऊन या.
सिनेमा :- “राव रंभा” आपल्या जवळच्या चित्रपटगृहात, असे कुशल बद्रिकेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान ‘रावरंभा’ हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ असलेला चित्रपट १२ मे रोजी प्रदर्शित झाला. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : “नक्की काय दाखवायचं आहे…” नव्या फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “मराठी इंडस्ट्रीमध्ये…”

या चित्रपटात अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल हे मुख्य भूमिकेत झळकत आहेत. तर अभिनेता अशोक समर्थ हे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने इत्यादी कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor kushal badrike share instagram post talk about ravrambha historical movie nrp

First published on: 28-05-2023 at 09:14 IST
Next Story
Video : बॉलिवूड अभिनेत्रीला ‘बहरला हा मधुमास’ची भुरळ, सात महिन्याची गरोदर असतानाही आवरला नाही डान्स करण्याचा मोह