‘बालक- पालक’ या २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे प्रथमेश परब(Prathmesh Parab) होय. प्रथमेशने ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘उर्फी’, ‘टकाटक’, या चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता मात्र प्रथमेश त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या पत्नीने त्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

प्रथमेश परबसाठी पत्नी क्षितिजाची खास पोस्ट

अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितिजाने प्रथमेशच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्षितीजा व प्रथमेशचे काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये तिने म्हटले, “पहिल्या भेटीतील शेकहँड ते तोच हात हातात घेऊन घेतलेली सप्तपदी मला सतत भारावून टाकते. या प्रवासातील प्रत्येक क्षण दृढ होतो आणि मन अलवार दवबिंदू होते. लग्नाआधी तू माझ्याकडून आय लव्ह यू वधवून घेतलं होतंस बरं. पण लव्ह यू टू म्हणून माझ्यावर माझ्याहीपेक्षा जास्त प्रेम करतोस हेही तितकच खरं. तुझं हसणं, हसवणं, समजून घेणं, समजावून सांगणं हे फक्त तुलाच जमू शकतं.बरं नवरा-बायको हे फक्त नावाला, झालोत आपण घट्ट मित्र. एकमेकांच्या सहवासात हळूहळू उलगडतंय सुखी संसाराचं सूत्र. तुझं क्रिकेटचं पॅशन ते फिल्मचं प्रिप्रेशन यातील क्षण नी क्षण मी जवळून अनुभवलाय. पडद्यावर खळखळून हसवणाऱ्या माझ्या सुपरस्टार नवऱ्याला माझी आठवण येतेय म्हणून मी रडताना पाहिलय. आपल्या डेट्सचे मेन्यू आणि व्हेन्यू तेच, फक्त माझ्या घराचा पत्ता तेवढा बदलला, मी न केलेला हट्टही तू माझ्याच नकळत पुरवला. हाच नाही तर तुझा १०० वा वाढदिवसही एकत्र साजरा करूयात, ही एकच आहे इच्छा”, असे म्हणत क्षितिजाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “लग्नानंतरचा तुझा पहिलाच वाढदिवस आणि आपण सोबत नसावं, प्रत्यक्षात भेटून नाही पण निदान शब्दांतून तरी व्यक्त व्हावं. तुला आवडतं ना आपले सगळे स्पेशल डेज साजरे करायला, म्हणूनच आज मला साजरं करायचंय, तुझ्यातल्या तुला. माणुसकीचा ओलावा किती सहज जपता येतो तुला, दिवसागणिक उलगडणारा तुझा गोड स्वभाव, रोज नव्याने प्रेमात पडतो मला. हाच नाही तर तुझा १०० वा वाढदिवसही एकत्र साजरा करूया ही एकच आहे इच्छा, आईबाबा आणि साईबाबा शप्पथ. तुझी प्रत्येक फिल्म ब्लॉकबस्टर होऊन हाऊसफुलचे बोर्ड लागोत याच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, अशा गोड शुभेच्छा क्षितिजाने दिल्या आहे.

हेही वाचा: जान्हवी कपूर मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिन्याला बॉयफ्रेंडबरोबर करायची ब्रेकअप; म्हणाली, “एकदा माझं…”

दरम्यान, प्रथमेश परब विविध कलाकृतींमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो.

Story img Loader