लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यापासून सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण आहे. बाप्पाची आरती, गाणी ऐकायला मिळतं आहेत. यंदा ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं आवुर्जन लावलं जात अन् गायलं सुद्धा जात आहे. सोशल मीडियावर तर या गाण्यावरील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतं आहेत. हेच लोकप्रिय गाणं आता संदीप पाठकच्या लेकीनं गायलं आहे. याचा व्हिडीओ अभिनेत्यानं नुकताच शेअर केला आहे.

हेही वाचा – “तू इतका सेक्सी का आहेस?” चाहतीच्या प्रश्नावर अभिनेता गश्मीर महाजनीचं उत्तर, म्हणाला….

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

अभिनेता संदीप पाठक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी लेकीबरोबरचे व्हिडीओ शेअर करत असतो. कधी देवाची प्रार्थना बोलताना तर कधी कविता बोलताना संदीपची लाडकी स्वरा पाहायला मिळते. आता तिनं खास गणपती बाप्पासाठी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं गायलं आहे.

हेही वाचा – “अंगावर गोष्टी काढू नका”, अमृता खानविलकरने स्त्रियांना दिला महत्त्वाचा सल्ला, स्वत:च्या मावशीचा अनुभव सांगत म्हणाली…

संदीपच्या लेकीचा हा गोड व्हिडीओ कलाकार मंडळींसह चाहत्यांनी लाइक केला आहे. शिवाय ‘मस्त’, ‘एक नंबर’, ‘खूप छान’ अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: “तुझ्याऐवजी माझं लग्न राक्षसाबरोबर झालं असतं तर बरं झालं असतं”, ‘ठरलं तर मग’मधील सायली-अर्जुनमध्ये नेमकं काय घडलं? पाहा

दरम्यान, संदीप पाठकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच त्यानं त्याच्या यूट्युब चॅनेलवर ‘बाप्पा सोबत गप्पा’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे चार भाग प्रदर्शित झाले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्याचं लोकप्रिय नाटक ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ याचे पुण्यात प्रयोग झाले.

Story img Loader