नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडींच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं आवर्जुन नाव घेतलं जात. अभिनया व्यतिरिक्त संकर्षणच्या कविता आणि त्याचं उत्कृष्ट सूत्रसंचालन या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात.

सोशल मीडियावर संकर्षण खूप सक्रिय असतो. दररोज येणारे अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकताच त्यानं विमानाच्या केबिनमधला भन्नाट अनुभव शेअर केला आहे.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
raj thackeray switzerland incident
“ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…

हेही वाचा – अभिनेता शशांक केतकरची गणरायाकडे ‘ही’ मागणी; म्हणाला, “माझ्या मुलासाठी…”

संकर्षणचा विमानाच्या केबिनमधला अनुभव…

“माझा हा अनुभव वेळ असेल तर; नक्की वाचा ..” कॅनसास सिटी हून क्लिव्हलँडला जाण्यासाठी विमानांत शिरलो तर फार गर्दी नव्हती.. विमान उडतं कसं? कसं चालवतात? याच्याविषयी मनात कायम प्रश्न पडलेले असतात. म्हणून दरवेळी मी विमानात बसताना कुतूहलाने केबीनकडे बघतोच.. आजही तेच केलं. तर हे “पायलट साहेब” (आपल्याकडच्या ड्रायव्हर साहेब , कंडक्टर साहेब सारखं म्हणतोय) जरा मोकळे वाटले…. माझ्याकडे बघून , स्वत:हून हसले.

आपल्याला “उडवून नेणारा पायलट” आपल्याला स्वत:हून स्माईल देतोय म्हटल्यावर हेच मोफत स्माईल दुप्पटीने परत करायला कसला भाव खायचा? म्हणून मी त्यांच्यापेक्षा जास्त मोकळा हसलो आणि त्याच्या केबीनकडे “काय भाऊ ; येऊ का घरात?”च्या नजरेनेच पाहिलं. त्यालाही ते कळलंच. त्याने मग स्वत:हून “Welcome to my working area” (मी काम करत असलेल्या विभागात तुमचं स्वागत आहे), असं म्हणाल्यावर मी फार फार खुष झालो गड्या.

पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला. जिथुन २००/३००/४०० लोकांना घेऊन ही विमानं उडत असतात. खूप सारे बटन्स, पायलटची खुर्ची , मॉनिटर , टेक ऑफ लँडिंगची ती दांडी हे मज्जा वाटली पाहताना. मला झालेला एकंदरीत आनंद पाहता तो परत स्वतःहून म्हणाला, “सिट देअर अ‍ॅण्ड क्लिक अ पिक्चर”. मी पाहातच राहिलो. मला प्रश्नं पडला की, हा माझ्या चेहरऱ्यावरचा अती आनंद पाहून मनात मला वेड्यात काढून माझी गंमत करतोय का? मग मी जरा कंट्रोल्ड वागायची अ‍ॅक्टींग करत “नो नो.. इट्स ओके ….” वगैरे म्हणालो तर “कॅप्टन पिटर रसल भाऊंनी” आग्रहाने पायलट सीटवर बसवलं आणि माझा फोटो घेतला . आर काय आनंद झाला म्हणून सांगू? मग प्रथेप्रमाणे “Can I click a Picture with you” (मी तुमच्याबरोबर एक फोटो काढू) असं वाक्यं कुणीतरी एकजण म्हणतंच, ते मी म्हणालो आणि पिटर भाऊंबरोबर फोटो काढला. थोड्या गप्पा झाल्या, नंबर एक्सेंज झाले. अजून जरावेळ एकत्रं घालवला असता, तर तो तरी म्हणाला असता की , “विमान चालवतोस का? किंवा मी तरी म्हणालो असतो “हो बाजूला मीच चालवतो.” पण त्याच्या आतच संभाषण थांबलं आणि मी माझ्या सीटवर येऊन बसलो आणि पूर्ण प्रवासभर “आता तो हे बटन दाबत असेल. आता तो स्पीकरवर बोलत असेल” असा विचार करत , आनंदात बसून राहिलो.

लोकंहो विचार करा. जरा स्माईल दिलं, प्रेमानं बोललं की, मनात असलं ते सगळं होतंय. आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्र “हवेत आहे”

हेही वाचा – “चार दिवसांपूर्वी आमच्याकडे खूप वाईट गोष्ट घडली…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला प्रसंग; म्हणाली…

दरम्यान, संकर्षणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याचा ‘संकर्षण वाया स्पृहा’ या कार्यक्रम जोरदार सुरू आहे. लवकरच त्याचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट भेटीस येणार आहे. २९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये संकर्षणने अजिंक्यराजे निंबाळकर ही भूमिका साकारली आहे.