सध्या मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची चलती आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ सारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तमोत्तम प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य उभे करताना निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची मोलाची साथ लाभली. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. यावर आधारित असलेला रावरंभा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

अभिनेता संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच संतोषने रावरंभा या चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर केल्या आहेत. यात त्याने अनेक चाहत्यांना हा चित्रपट पाहावा, असे आवाहन केले आहे. त्याबरोबरच संतोषने अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्टदेखील शेअर केली आहे. मात्र त्यामुळे संतोष जुवेकरला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
आणखी वाचा : “कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे…” ‘रावरंभा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास

“स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा “तानाजी मालुसरे” आधी कळायला हवा”, अशा आशयाची पोस्ट कुशलने केली होती. त्याची हिच पोस्ट संतोष जुवेकरने शेअर केली. त्यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली. “तुमचे पिच्चरं आली कि शिवराय आठवत्यात तुम्हाला , पैसे कमावता फक्त, महाराज त्यांचे मावळे तुम्हाला तरी कळलेत का अजून . ते स्पायडरमॅन, हल्क, आर्यन मॅन, मुलांना का कळायला हवीत. वाक्य तयार करण्यासाठी काहीही बाकळत जावू नका….” अशी कमेंट त्याने केली आहे.

त्यावर संतोष जुवेकरने प्रतिक्रिया दिली आहे. “मित्रा शिवराय अजून कुणालाच कळले नाहीत आणि कळणारही नाहीत कारण माझा राजा स्वराज्या साठी लढवह्या आहे आणि खरा स्वराज्यकरणी (राजकारणी नव्हे)आहे. पुन्हां असा न होणे राजा, पुन्हां असा न होणे लढवय्या, पुन्हां अशी न होणे काळजाला कळ स्वराज्या परी शिवराया सारखी. पुन्हां अशी न होणे माता शिवरायाची जिजाऊ सारखी. त्यानं दिलंय की ओंजळीत आपल्या. मग घेऊया आणि भाळी माळूया हा भंडारा. जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी”, असे संतोष जुवेकर म्हणाला.

आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर…” कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्याबरोबरच संतोष जुवेकरने फेसबुकवर या पोस्टचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. त्यात त्याने माफीही मागितली आहे. “मला माझ्या एका मित्राने खूप खडसावलं, त्याच बरोबरही असेल पण काहीस उगाच निरर्थक वाटलं म्हणुन हे माझं उत्तर त्याला दिलंय. माझं काही चुकलं असेल तर माफ करा. इतिहास आपण वाचलाय आणि ऎकलाय पण आपल्यापैकी पहिला कुणीची नाही. फक्त मनात आणि डोक्यात आणि विचारात आणि शरीरात आणि आणि आणि जे काय असल तिकडं आणि तिथे फक्त माझा शिवराय”, अशी पोस्ट संतोष जुवेकरने केली आहे.

आणखी वाचा : “तान्हाजीराव घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा चढले याची नोंद नाही”, कुशल बद्रिकेच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट, अभिनेता म्हणाला “तुमचं बरोबर पण…”

दरम्यान ‘रावरंभा’ या चित्रपटात अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल हे मुख्य भूमिकेत झळकत आहेत. तर अभिनेता अशोक समर्थ हे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने इत्यादी कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळत आहे.