अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या उत्तम अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान मिळवलं आहे. सिद्धार्थने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सध्या तो मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याची नुकतीच भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाबरोबर भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

आयपीएल निमित्ताने सिद्धार्थ जाधवची भेट सुरेश रैनाबरोबर झाली. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जचा सामना झाला. या सामन्याचे मराठी समालोचन करताना सिद्धार्थ जाधव दिसला होता. याच वेळी सिद्धार्थची भेट सुरेश रैनाबरोबर झाली. यावेळी सुरेश रैनाने अभिनेत्याच्या कामाचं भरभरून कौतुक केलं.

हेही वाचा – अभिनेता प्रसाद खांडेकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला दिली पाणीपुरी पार्टी

अभिनेता सिद्धार्थ जाधव व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “ग्रेटभेट. खासक्षण. सुरेश रैना सर तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. भारतीय क्रिकेट संघातील एक नम्र व्यक्ती सुरेश रैना आहेत. माझ्या कामाचं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. खूप मजा आली. पुन्हा लवकरच भेटायला उत्सुक आहे. तुमचा खूप अभिमान आहे.”

हेही वाचा – “ऋजुता लग्न झालं तरी साडी नेसत नाही का?” चेतन वडनेरेला चाहत्याने बायकोसंदर्भात विचारला प्रश्न, अभिनेता सडेतोड उत्तर देत म्हणाला…

सिद्धार्थ व सुरेश रैनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. या व्हिडीओवर सुरेश रैनासह अभिनेता गौरव मोरे, कुशल बद्रिके अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय “सिद्धू मराठीतला पहिला सुपरस्टार…”, “दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये”, “खूप छान सिद्धू”, अशा अनेक चाहत्यांनी सिद्धार्थ जाधवच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – “संधीचं सोनं करणं म्हणजे…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने नम्रता संभेरावच्या ‘नाच गं घुमा’मधील कामाचं केलं भरभरून कौतुक, म्हणाला…

दरम्यान, सिद्धार्थ जाधवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अभिनेता ‘धर्मवीर २’ चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरण करताना दिसला होता. याचा व्हिडीओ अभिनेते, निर्माते मंगेश देसाईंनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. त्यामुळे ‘धर्मवीर २’ चित्रपटातील एका गाण्यात सिद्धार्थ झळकणार असल्याचं समोर आलं होतं. माहितीनुसार, या गाण्यात सिद्धार्थबरोबर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी असल्याचं म्हटलं जात आहे.