गेल्या काही दिवसांपासून ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सोशल मीडियावर क्रेझ सुरु आहे. प्रत्येक घराघरात बाईपण भारी देवा या चित्रपटातील गाणी, डायलॉगही हिट झाले आहेत. या चित्रपटात अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकरने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. यावेळी त्याच्याबरोबर एक मुलगी झळकली होती. आता सध्या सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे. नुकतंच सोहमने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांनी पल्लवी काकडे ही भूमिका साकारली आहे. याच चित्रपटात सोहम हा पल्लवीचा मुलगा असल्याचे दाखवण्यात आले आहे. सोहम हा परदेशात शिकण्यासाठी गेलेला असताना तो त्याच्या आईला फोन करतो. यावेळी सोहमबरोबर एक मुलगी असते आणि तो आईला तिची ओळख करुन देतो. यानंतर सुचित्रा बांदेकर या तिला हाय हॅलो करतात.

सोहमच्या चित्रपटातील त्या सीनचा फोटो शेअर करत एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. यावर त्याने दादा तुमचे दर्शन, वहिनींना नमस्कार असे म्हटले आहे. त्यावर सोहमने इन्स्टाग्रामवर एक कमेंट केली आहे. माझ्यापेक्षा जास्त ही कोण आहे, हेच सर्वांना महत्त्वाचं वाटतंय आजकाल, असे सोहमने म्हटले आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ची जादू कायम, चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केलेले फक्त ‘इतके’ रुपये

सोहम बांदेकरची कमेंट

त्यानंतर सोहमने ती मुलगी कोण याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. “मी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. केदार शिंदे काका यासाठी धन्यवाद. मी तुमचा गोंधळ समजू शकतो.” असे सोहमने म्हटले आहे.

“विशेष म्हणजे चित्रपटात माझ्याबरोबर जी मुलगी होती, त्या मुलीला मी खरंच ओळखत नाही. आई तर यावरुन माझ्यावर अजिबात चिडलेली नाही. सर्वांचे विशेष आभार आणि प्रेम. ज्यांनी ज्यांनी मला मेहनत घेऊन या सीनचे फोटो काढून पाठवले”, असे सोहमने इन्स्टाग्राम स्टोरीवर कमेंट करत सांगितले.

आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची रंगली चर्चा, डिझाईनर म्हणाली…

सोहम बांदेकर

आणखी वाचा : “माझा प्रयोग होता अन्…” वंदना गुप्तेंनी पृथ्वीराज चव्हाणांच्या ताफ्यात घुसवलेली गाडी; म्हणाल्या “त्यांचे सुरक्षारक्षक…”

दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने दहा दिवसात २६ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor soham bandekar baipan bhari deva movie share screen with girl talk about instagram nrp
First published on: 12-07-2023 at 09:48 IST