scorecardresearch

Premium

“दोन-अडीच तास…”, ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपट पाहिल्यावर सुबोध भावेची प्रतिक्रिया

या चित्रपटाबद्दल अभिनेता सुबोध भावेने प्रतिक्रिया दिली आहे.

subodh bhave teen adkun sitaram
सुबोध भावेची प्रतिक्रिया

अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल अभिनेता सुबोध भावेने प्रतिक्रिया दिली आहे.

या चित्रपटात तीन अतरंगी मित्र अन् त्यापैकी एकाची गर्लफ्रेंड यांची भन्नाट गोष्ट पाहायला मिळत आहे. नुकतंच हा चित्रपट पाहिल्यानंतर सुबोध भावेने प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तो म्हणाला, “मी आताच तीन अडकून सीताराम हा धमाल चित्रपट बघितला. यात प्राजक्ता, वैभव, आलोक आणि संकर्षण या सर्वांची एकत्र धमाल बघताना खूप मज्जा आली.”
आणखी वाचा : ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवात नेमकी कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले “फक्त १३ दिवसांसाठी…”

subodh bhave aatmapamphlet movie
“आताच्या काळात…”, ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहिल्यानंतर सुबोध भावेची प्रतिक्रिया, म्हणाला “कृपया…”
Praajakta
ऐतिहासिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्राजक्ता गायकवाड दिसणार हटके अंदाजात, म्हणाली…
teen-adkun-sirtaram
‘तीन अडकून सीताराम’चा नेमका अर्थ काय? अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांचा खुलासा
why anurag kashyap dont work with salman khan shahrukh khan
अनुराग कश्यप सलमान-शाहरुख खानबरोबर का काम करत नाही? खुलासा करत म्हणाला, “त्यांचे चित्रपट फ्लॉप…”

“मला असं वाटतं की आता आजूबाजूला पाऊस पडतो, रस्ते तुंबलेत, खड्डे पडलेत या सगळ्यात दोन-अडीच तास एक छान चित्रपट पाहून तुम्हाला हसता येतंय आणि यातून तुमचे निखळ करमणूक होते याचं महत्त्व जास्त आहे. तो या चित्रपटाने दिल्याबद्दल या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो”, असे सुबोध भावेने म्हटले.

“छोटे छोटे परिस्थितीनुसार घडणारे विनोद असतील ते तुम्हाला हसवतात आणि तीन मित्रांची एक धमाल तुमच्यासमोर सादर करतात. पुन्हा एकदा या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. आवर्जुन हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा”, असेही आवाहन त्याने केले.

आणखी वाचा : “मला लंडनला खरेदी करता आली नाही, कारण…” प्राजक्ता माळीने सांगितला किस्सा, म्हणाली “माझे पैसे…”

दरम्यान या चित्रपटात वैभव तत्त्ववादी, प्राजक्ता माळी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे व हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काल २९ सप्टेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor subodh bhave review about teen adkun sitaram prajakta mali vaibhav tatvawadi starrer movie nrp

First published on: 30-09-2023 at 10:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×