सध्या सगळीकडे लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशामध्येच कलाक्षेत्रामधील एका लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. सुनील यांची लेक अंकिता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अंकिताच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सुनील यांचा लेक अभिनेता शुभंकर तावडे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे बहिणीच्या लग्नाचे विविध व्हिडीओ व फोटो पोस्ट करत आहे. तर सुनील यांनीही काही व्हिडीओ शेअर केले आहेत. १६ मार्चला (गुरुवारी) अंकिताच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. या हळदी कार्यक्रमाचे व्हिडीओ समोर आले आहेत.
आणखी वाचा – अभिनयासह आता महेश मांजरेकरांच्या मुलाने सुरू केलं स्वतःचं हॉटेल, नावही आहे फारच खास
लेकीच्या हळदीमध्ये बेभान होऊन नाचतानाचा सुनील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अंकिताला हळद लावत असतानाच ते नाचताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. तर त्यानंतर कुटुंबातील इतर मंडळींबरोबर ते डान्स करत आहेत. तसेच लेक शुभंकरबरोबरही त्यांनी डान्स केला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा – खरंच की काय! ही सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आहे सहा मुलांची आई? मुलाखतीत केला अजब खुलासा
याआधी अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर डान्स करतानाचा सुनील यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सुनील यांची मुलगी अंकिताचाही कलाक्षेत्राशी संबंध आहे. ती स्टार प्रवाह वाहिनीचं वरिष्ठ निर्माती म्हणून काम पाहते. तर शुभंकरही अभिनयक्षेत्रामध्ये उत्तम काम करत आहे. सुनील सध्या लेकीच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत.