Marathi Actor Meets Riteish Deshmukh : बॉलीवूडसह मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अभिनेत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काही दिवसांपूर्वी रितेश-जिनिलीयाने स्पोर्ट्स लीगमध्ये पुण्याचा संघ विकत घेतला. नुकतीच वर्ल्ड पिकलबॉल लीगची सुरुवात झाली असून रितेश-जिनिलीयाच्या संघाचं नाव पुणे युनायटेड असं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२४ जानेवारीपासून या वर्ल्ड पिकलबॉल लीगला सुरुवात झाली असून, रितेश-जिनिलीया आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचले आहेत. या लीगमध्ये अभिनेत्याला मराठीतला एक सुपरस्टार अभिनेता भेटला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मराठी कलाविश्वाचा ‘मितवा’ म्हणून अभिनेता स्वप्नील जोशीला ओळखलं जातं. आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलेलं आहे. स्वप्नीलने वर्ल्ड पिकलबॉल लीगमध्ये नुकतीच रितेश देशमुखची भेट घेतली. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रितेश व स्वप्नीलची याठिकाणी गळाभेट झाली. तर, जिनिलीया समोर येताच स्वप्नीलने तिला हात जोडून अभिवादन केलं.

स्वप्नील जोशीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये ‘भाऊ आणि वहिनी’ असं लिहिलं आहे. तर, रितेशने हा व्हिडीओ रिशेअर करत, “स्वप्नील माय ब्रदर…लव्ह यू मॅन” असं म्हटलं आहे.

याशिवाय जिनिलीयाने, “तुम्हाला भेटून नेहमीच छान वाटतं” अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिली आहे. मराठी कलाकारांमधलं हे सुंदर बॉण्डिंग पाहून नेटकरी सुद्धा रितेश आणि स्वप्नीलचं भरभरून कौतुक करत आहेत.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/riteish_a2be44.mp4

दरम्यान, रितेश आणि स्वप्नीलच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर स्वप्नील जोशी लवकरच ‘चिकी चिकी बुबूम बूम’ या चित्रपटात झळकणार आहे. हा सिनेमा येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख सध्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असून याची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख करणार आहे. तसेच या चित्रपटाला अजय-अतुल संगीत देणार आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor swapnil joshi meets genelia and riteish deshmukh video goes viral sva 00