scorecardresearch

“मराठी चित्रपटात शिवी आल्यावर प्रेक्षक…” स्वप्निल जोशी स्पष्टच बोलला

“दुसऱ्या भाषेतील चित्रपटात शिवीगाळ चालते आणि मराठीत…” स्वप्निल जोशी संतापला

swapnil joshi
स्वप्निल जोशी

स्वप्निल जोशी हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा विविध माध्यमात त्याने आतापर्यंत काम केलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. स्वप्निल जोशी हा कायमच त्याची मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. नुकतंच स्वप्निल जोशीने मराठी सिनेसृष्टीविरुद्ध इतर भाषिक सिनेसृष्टीबद्दल भाष्य केले.

नुकतंच स्वप्निल जोशीने महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला मराठी भाषेतील चित्रपट विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याबरोबरच त्याला मराठी चित्रपटसृष्टीच्या सध्याच्या स्थितीबद्दल मतही विचारण्यात आले. यावेळी त्याने याबद्दल स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर मराठी अभिनेत्याचे ट्वीट, म्हणाला “आज सगळेच…”

“मराठी प्रेक्षकांचा मराठी चित्रपटांकडे आणि इतर भाषेतील चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. प्रेक्षक मराठी चित्रपटासाठी वेगवेगळे निकष लावतो. जे प्रेक्षक दुसऱ्या भाषेतील चित्रपटाचं कौतुक करतात, तसा चित्रपट मराठीत बनवल्यावर त्या प्रेक्षकांच्या पचनी ते पडत नाही”, असे स्वप्निलने यावेळी म्हटले.

“दुसऱ्या भाषेतील चित्रपटांच्या संवादत शिवीगाळ चालते. पण मराठीत कथानकाची गरज असतानाही संवादात शिवी आल्यावर प्रेक्षक भुवया उंचावतात. भावना दुखावल्या जातात. मराठी सिनेविश्व हा विषय खूप व्यापक आहे. थोडक्यात याचं उत्तर देणं कठीण आहे. पण महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला स्क्रीन्स मिळाव्यात हा आग्रह धरावा लागतो. हाच मुळात विचार करण्याचा विषय आहे.

कोणत्याही कलेत चांगलं हा सापेक्ष भाव आहे. एखाद्याला एखादा चित्रपट आवडेल तर दुसऱ्याला तो कदाचित आवडणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी प्रत्येक चित्रपट पाहून आपल्या आवडीनुसार चित्रपटाला दुजोरा द्यायला हवा. सरासरी पाहता सर्व भाषिक चित्रपटांची स्थिती सारखीच आहे. हिंदीतही तीनशे चित्रपट बनतात. त्यातील पाच प्रचंड चालतात. दाक्षिणात्य राज्यांमधील निवडक चित्रपटच प्रेक्षक डोक्यावर घेतात. मराठीतही असंच चित्र आहे”, असेही स्वप्निल जोशीने सांगितले.

आणखी वाचा : “म्हणे मी पुण्याचा…” स्वप्निल जोशीने मराठीत ट्वीट करताना चुकवले तीन शब्द, नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले

दरम्यान अभिनेता स्वप्निल जोशी हा सध्या त्याच्या ‘वाळवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 13:10 IST