Marathi Actors Celebrates Ganesh Chaturthi 2026 : सर्वांचे लाडके गणपती बाप्पा वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर भक्तांच्या भेटीला आले असून, आज ( १४ सप्टेंबर ) घराघरांत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त आनंदाचं वातावरण आहे. चाकरमानी कोकणात पोहोचले असून, लालबाग-परळ परिसरात हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे.
आज अनेक मराठी कलाकारांच्या घरी देखील गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आता पुढचे दहा दिवस सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. “तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता…” म्हणत अनेक मराठी कलाकारांच्या घरी आज बाप्पा विराजमान झाले आहेत. रवी जाधव, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी तर बाप्पाची मूर्ती घरीच घडवली आहे.
अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पाचं आगमन झालं आहे.

तर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दरवर्षी तिच्या भावाच्या साथीने बाप्पाची सुबक मूर्ती घडवते. घरच्या घरी बाप्पाची मूर्ती घडवून सोनालीने मनोभावे पूजा केली आहे.

मृण्मयी व गौतमी देशपांडे यांनी बाप्पाच्या स्वागतासाठी केली घरगुती सजावट
अभिनेता अक्षय केळकर गणपतीनिमित्त गावी कोकणात पोहोचला आहे.


ज्ञानदा रामतीर्थकरने लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव साजरा केला आहे.
दरम्यान, शिव ठाकरे, रुपाली भोसले, शशांक केतकर, अंकिता लोखंडे, जुई गडकरी, सुयश टिळक, सुशांत शेलार या सगळ्या कलाकारांनी आपल्या घरी बाप्पाचं मनोभावे स्वागत केलं आहे. दरम्यान, छोट्या पडद्यावरील सगळ्याच मालिकांमध्ये आता गणेशोत्सवाचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. त्यामुळे पुढचे दहा दिवस सर्वत्र उत्साहाचं वातावरण असणार आहे.
