Premium

“स्वत:च्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी…” अभिज्ञा भावेचे रिल स्टार, इन्फ्लुएन्सरला खुलं पत्र, म्हणाली “दुर्दैवाने माझ्या इंडस्ट्रीत…”

“मेहनत करणाऱ्यांना संधी मिळत नाही आणि लोकप्रियता असलेल्यांना…” अभिज्ञा भावेचा रिल स्टारवर संताप, म्हणाली “आपले प्रोफेशन…”

abhidnya bhave feature
अभिज्ञा भावेचा रिल स्टार, इन्फ्लुएन्सरवर संताप

मराठी सिनेसृष्टीतील टॉप १० अभिनेत्रींच्या यादीत अभिज्ञा भावेचे नाव कायमच घेतले जाते. अभिनेत्री अभिज्ञा भावे ही कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती अनेकदा विविध मुद्द्यांवर भाष्य करत असते. नुकतंच अभिज्ञा भावेने सोशल मीडियावरील रिल स्टार, इन्फ्लुएन्सर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिज्ञा भावेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने सोशल मीडियावरील रिल स्टार, इन्फ्लुएन्सर याबद्दल एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. यावेळी तिने इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर यांना एक खुलं पत्र लिहित अनोखं आवाहन केले आहे.
आणखी वाचा : “नक्की काय दाखवायचं आहे…” नव्या फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “मराठी इंडस्ट्रीमध्ये…”

अभिज्ञा भावेची पोस्ट

“मी कधीही कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या विरोधात नव्हते. ते कर्तृत्ववान आहेत, याबद्दल मला शंका नाही. पण जेव्हा अतिशय कर्तृत्व आणि कलागुण असलेल्या आणि ज्यांनी वर्षानुवर्षे यात काम केलंय, मेहनत केलीय अशा व्यक्तींऐवजी लोकप्रिय लोकांना प्राधान्य दिले जाते, तेव्हा मला ही एक समस्या असल्याचे जाणवते.

जेव्हा एखाद्या विशिष्ट कलेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांऐवजी लोकप्रिय चेहरे दिसतात, कारण फक्त ते लोकप्रिय आहेत. पण त्यामुळे जे लोक त्यात मेहनत करतात त्यांना संधी मिळत नाही. एखाद्या ठिकाणचे प्रतिनिधीत्व करणे हे वेगळे असते आणि स्वत:च्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी इंटरनेटचा वापर करुन घेणे, ज्याचा तुम्हाला फायदा होईल, या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या असतात.

मी स्वत: तुम्हाला खूप फॉलो करते. कारण तुम्ही जे काही करता ते फार चांगले आहे. पण मी कधीही कोणत्याही व्यासपीठावर तुमची जागा घेण्याचा किंवा तुम्हाला कॉपी करण्याचा प्रयत्न करत नाही. कारण प्रत्येकजण हा ज्याच्या त्याच्या जागी योग्य असतो.

दुर्दैवाने माझ्या इंडस्ट्रीत हा ट्रेंड चालू झाला आहे आणि हे सर्वात निराशाजनक आहे. त्यामुळे आपणच आपले प्रोफेशन्स वेगवेगळे ठेवूया. एक जबाबदार इन्फ्लुएन्सर, प्रोड्युसर, क्राफ्टमॅन, दिग्दर्शक आणि एक जबाबदार ग्राहक देखील बनूया. कारण माझ्यासारखे अनेक इंटरनेटचा वापर करणारे लोक तुम्हाला पसंत करतात आणि तुम्ही नियम बनवू किंवा मोडू शकता. एक कलाकार”, असे अभिज्ञा भावेने म्हटले आहे.

अभिज्ञा भावेची पोस्ट

आणखी वाचा : “गरोदर आहेस का?” अभिज्ञा भावेच्या फोटोंमुळे चर्चांना उधाण, पती कमेंट करत म्हणाला…

दरम्यान अभिज्ञा भावेने केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अद्याप कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तिच्या या पोस्टवर सिनेसृष्टीसह चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress abhidnya bhave angry on social media influencers said not mix professions nrp

First published on: 24-05-2023 at 19:25 IST
Next Story
‘वेडात मराठे वीर दौडले सात’चे चित्रीकरण वेगात सुरू