'माहरेची साडी' हा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी आहे. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. ९०च्या दशकातील या चित्रपटाने लोकप्रियतेचा आणि उत्पन्नाचा उच्चांक गाठत इतिहास लिहिला होता. मराठी रसिकांच्या मनावर विशेषतः महिला रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत चर्चा रंगली आहे. मराठीतील दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांनी 'माहरेची साडी' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या सोशिक मुलगी व सूनेच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. चित्रपटाप्रमाणेच त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. माहरेची साडी चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. अलका कुबल यांनी नुकतीत 'झी मराठीच्या अवॉर्ड' सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. हेही वाचा>> “नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो” प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला “माझ्या पत्नीने…” हेही वाचा>> प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने लेकीच्या लग्नात जावयाकडे मागितलेले तब्बल पाच लाख रुपये, नेमकं काय घडलं होतं? 'झी मराठीच्या अवॉर्ड' सोहळ्यात अलका कुबल यांना गाजलेल्या माहरेची साडी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत प्रश्न विचारण्यात आला. "माहेरची साडी २ मध्ये अलका कुबल सुनेचा छळ करताना दिसणार आहेत, असं आम्हाला कळलं", असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, "मी पण याबद्दल ऐकलं. पण मला याबाबत नक्की काहीच सांगता येणार नाही". हेही वाचा>> “…तर कार्यक्रमात धुडगूस घालू” एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला मनसेचा विरोध, नेमकं प्रकरण काय? दरम्यान, 'माहेरची साडी' चित्रपटाच्या सिक्वेलबाबत दिग्दर्शक विजय कोंडके यांनी लोकसत्ता ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं होतं. " मी चित्रपटाच्या कथेवर काम करत असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर कलाकारांची निवड करण्यात येईल. 'माहेरची साडी २' काढण्याचा माझा विचार आधीपासूनच होता. माहेरची साडीमध्ये अलका शेवटी मरते असं दाखविण्यात आलं होतं. ती गेल्यानंतर तिने जन्म दिलेल्या मुलाचं आणि तिच्या कुटुंबाचं काय झालं असेल? यावर आधारित चित्रपटाचं कथानक असेल", असं ते म्हणाले होते.