मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयानं आणि नृत्य कौशल्यानं वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. 'मुंबई सालसा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अमृता सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अशा या हरहुन्नरी अमृताने स्त्रियांना एक मोलाचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हेही वाचा - Video: “तुझ्याऐवजी माझं लग्न राक्षसाबरोबर झालं असतं तर बरं झालं असतं”, ‘ठरलं तर मग’मधील सायली-अर्जुनमध्ये नेमकं काय घडलं? पाहा अलीकडेच अमृताचे ‘गणराज गजानन’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यामुळे या गाण्याच्या प्रमोशननिमित्ताने ती सध्या टेलीव्हिजनवरील काही कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच एंटरटेन्मेंट मीडियाशी देखील या गाण्याच्यानिमित्ताने ती संवाद साधत आहे. नुकतंच अमृताने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं गेलं की, "अशी कोणती गोष्ट आहे जी बायकांनी लावू धरली पाहिजे?" हेही वाचा – महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित केलेल्या नदीचा व्हिडीओ शरद पोंक्षेंनी केला शेअर; म्हणाले, “जगातील…” यावर अमृता म्हणाले की, "स्त्रियांसाठी सांगायचं झालं तर, प्लीज अंगावर गोष्टी काढू नका. प्लीज स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असू दे. आता फक्त आरोग्याच्यासंबंधित गोष्टी राहिल्या नाहीयेत. मुलांचं, घराचं, पैशाचं, व्यवसायाचं, नवऱ्याचं अशा अनेक गोष्टींचा ताण तुमच्या शरीरात कुठेतरी साठला जातो. आणि हेच कधीतरी अचानक वर येईल आणि तेच जीव घेणं ठरेल, हे तुम्ही नाही सांगू शकत." हेही वाचा – “देवाने स्वर्गातून पृथ्वीवर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंनी सोनाली कुलकर्णींचे का मानले आभार? "मला असं वाटतं, तीन ते चार महिन्यात ज्या तुमच्या काही स्त्री रोगासंबंधित चाचण्या असतात, हार्मोनल चाचण्या असतात त्या करून घ्या. तुमची सतत शारिरीक चाचणी करत राहा. तुमची आई असेल, मावशी असेल, बहीण असेल, वहिनी असेल प्लीज त्यांना सांगा की, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुम्ही ठीक आहात ना, तर घर ठीक आहे. नाहीतर काहीच ठीक राहणार नाही. मी माझ्या मावशीबाबत खूप बघितलंय. तिने इतक्या गोष्टी अंगावर काढल्या ना. प्लीज तुमच्या मुलांसाठी तुम्ही असं करू नका. जर तुम्ही अंगावर काढलं आणि दुर्दैवाने काहीतरी झालं तर अख्ख्या घरावरती फार वेगळा परिणाम होईल," असं अमृता खानविलकर म्हणाली.