मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसादने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रसाद अभिनेत्याबरोबरच एक उत्तम दिग्दर्शकही आहे. आतापर्यंत त्याने मराठीतील अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सोशल मीडियावर प्रसाद मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच प्रसादचा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. दरम्यान, अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती. प्रसाद व अमृतामध्ये घट्ट मैत्री आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. चित्रपटाचा सेट असो वा खासगी आयुष्य, प्रत्येक ठिकाणी दोघांमध्ये चांगले बॉण्डिंग असलेले बघायला मिळते.

हेही वाचा- “चार-पाच सेकंदांसाठी हदय बंद…” प्रशांत दामलेंनी सांगितला हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचा प्रसंग; म्हणाले, “ऑपरेशन थिएटरमध्ये…”

दरम्यान प्रसादच्या वाढदिवसानिमित्त अमृताने त्याला खास भेटवस्तूही दिली. प्रसादने इन्स्टाग्रामवर या भेटवस्तूचा फोटो शेअर केला आहे. अमृताने प्रसादला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून घड्याळ दिले आहे. फोटोवरुन हे घड्याळ महागडे असल्याचे दिसून येत आहे. प्रसादने या भेटवस्तूचा फोटो आपल्या इन्स्टाग्रावर शेअर करत अमृताला टॅगही केला आहे.

प्रसादच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास मालिका, नाटक, चित्रपटांमधून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’सारख्या सुपरहिट चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले आहे. आता लवकरच त्याचा ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांची भूमिका सकारणार आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांकडून या भागाला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress amruta khanvilkar give gift to prasad oak on his birthday actor shared post on social media dpj
First published on: 21-02-2024 at 12:10 IST