Amruta Khanvilkar revealed whom she is scared: अमृता खानविलकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अभिनयाबरोबरच तिच्या नृत्यासाठीदेखील ओळखली जाते. अमृता मराठी-हिंदी चित्रपटांत विविध भूमिका साकारताना दिसत आहे.

सध्या अमृता लग्नपंचमी या नाटकात काम करत आहे. निपुण धर्माधिकारी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून मधुगंधा कुलकर्णी यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. या नाटकात अमृताबरोबर स्वप्नील जोशीदेखील प्रमुख भूमिकेत आहे. प्रेक्षकांचा या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

याबरोबरच अभिनेत्री नुकतीच ‘तस्करी: द स्मगलर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. ही वेब सीरिज १४ जानेवारीला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमध्ये तिने मिताली कामत ही भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. या वेब सीरिजमध्ये अॅक्शन सीक्वेन्स करताना दिसली आहे. हे अॅक्शन सीक्वेन्स प्रेक्षकांना आवडले आहेत.

Award Banner

अमृता खानविलकर कोणाला घाबरते?

आता अमृताने नुकतीच नवशक्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने ती कोणाला घाबरते, यावर वक्तव्य केले. ती म्हणाली, “मी माझ्या आईला खूप घाबरते. त्यामुळे ती ज्या गोष्टी करते, तिचं जे डिपार्टमेंट असतं, त्यामध्ये मी पडत नाही. मग ते भाजी आणणं असो किंवा किचनमध्ये जाऊन काही गोष्टी करणं असो. मी तिला घाबरते.”

“चुकून मला कधी रात्री भूक लागली तरी मी तिलाच फोन करते. मग ती सांगते कुठे काय ठेवले आहे. त्यामुळे आमच्याकडेची मिताली कामत ही माझी आई आहे”, असे म्हणत अमृताने आईला घाबरत असल्याचे वक्तव्य केले.

अमृताने अनेकदा सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करते. काही वेळा ती आईबरोबरचे व्हिडीओदेखील शेअर करते. त्यावेळी त्यांच्या मजेशीर गप्पा ऐकायला मिळतात. अमृता अनेकदा तिचे स्कीन केअर रुटिन सांगते, तसेच तिच्या व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. अमृताच्या अभिनयाला चाहते जितकी दाद देतात, तितकीच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरदेखील कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो.

काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर अमृताच्या वेब सीरिजचे कौतुक केले होते. आता अभिनेत्री आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, ‘तस्करी: द स्मगलर्स’ या वेब सीरिजमध्ये इमरान हाश्मी, अमृता खानविलकर, शरद केळकर, नंदिश संधू, अनुराग सिन्हा, हेमंक खेर असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.