‘माझा होशील ना’ फेम लोकप्रिय मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असणारी गौतमी बऱ्याचदा आपले अनुभवही शेअर करत असते. आता भर उन्हाळ्यात लाइट नसल्याने तिने संताप व्यक्त केला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर उपरोधिक पोस्ट शेअर केली आहे.

या कडक उन्हाळ्यात घरात वीज नसेल तर उकाड्यात राहायचं कसं, असा प्रश्न पडतो. त्यातही दोन-तीन तास लाइट नसेल तर विचारूच नका. मतदानाच्या दिवशीच लाइट गेल्याने गौतमीने नाराजी व्यक्त केली आहे. “उन्हाळ्यात लाइट नसणे..दोन-तीन तास..मज्जा आहे नाही…क्या बात इलेक्ट्रिसिटी देणारे… PS- आज निवडणुका चालू झाल्या ना” अशी पोस्ट गौतमीने केली आहे.

“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”

गौतमी देशपांडेची स्टोरी (फोटो – स्क्रीनशॉट)

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीच लाइट गेल्याचा उल्लेख करत गौतमीने पोस्ट केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला भारतातील अनेक राज्यांमध्ये मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं. यामध्ये महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांचा समावेश होता.