मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच गिरिजा ओक, गेल्या काही महिन्यांपासून ती संपूर्ण देशभरात ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावारुपाला आली आहे. काही महिन्यांपूर्वी तिचे निळ्या साडीतले फोटो तुफान व्हायरल झाले होते. त्यामुळे गिरिजाला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळतंय. तिचे अनेक जुने फोटो अन् व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री नुकतीच लाडक्या लेकासह अमेरिकेला गेली होती. या ट्रिपचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गिरिजाने शेअर केलेल्या या गोड फोटोंवर चाहत्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
गिरिजा ओकच्या मुलाचं नाव आहे कबीर. अभिनेत्रीने अलीकडेच आपल्या लाडक्या लेकाचा १३ वा वाढदिवस साजरा केला. आता या दोघांचे अमेरिका ट्रिपचे गोड फोटो सर्वत्र चर्चेत आले आहेत. या ट्रिपदरम्यान गिरिजाने Universal Epic Universe, Orlando या थीम पार्कला भेट दिली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या थीम पार्कची झलक पाहायला मिळत आहे. गिरिजा आणि कबीर या दोघांनीही याठिकाणी धमाल केली. याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना Super Nintendo World, हॅरी पॉटरच्या जादुई विश्वाचा अनुभव घेता येईल.
गिरिजाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा पहिलाच फोटो कबीरबरोबरचा मिरर सेल्फी आहे. यामध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा सुंदर व्ही-नेक गाऊन घातल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय गिरिजाने काही दिवसांपूर्वीच तिचा लूकही बदलला आहे. शॉर्ट हेअर्समध्येही ती तेवढीच छान दिसतेय.
नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “गिरिजा मॅडम हेअरकट का केलात?”, “मॅडम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे”, “आई अन् मुलाचं जगात भारी बॉण्डिंग”, “मॅम मस्त फिरून घ्या”, “गिरिजा-कबीर गोड फोटो” अशा असंख्य प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.
गिरिजाबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुख खानच्या ‘जवान’पासून ते आमिर खानच्या ‘तारे जमींन पर’पर्यंत अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री नुकतीच ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमात झळकली. या सिनेमाची निर्मिती कंगना रणौतच्या मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात आली होती. १२ जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता आणि आता हा चित्रपट प्रेक्षक ZEE5 वर पाहू शकतात.
