अभिनेत्री हेमांगी कवी हिनं आपल्या अभिनयानं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही क्षेत्रात वैविध्यपूर्ण भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली आहे. अलीकडेच ती रवि जाधव दिग्दर्शित ‘ताली’ वेब सीरिजमध्ये झळकली होती. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीनं आता हिंदी चित्रपट, सीरिजमध्ये काम न करण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.
हेही वाचा – Video: लहान मुलगा बोबड्या बोलात म्हणाला ‘ऐश्वल्या लाय’, अभिनेत्रीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. एवढंच नाहीतर ती सोशल मीडियावर आपली परखड मत देखील व्यक्त करत असते. नुकताच तिनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे; ज्यामधून तिनं हिंदीत काम न करणाचं कारण स्पष्ट केलं आहे.
या व्हिडीओत सुरुवातीला हेमांगीचा एक फोटो दिसतो. ज्यावर एक प्रश्न लिहिला आहे की, “तू हिंदी चित्रपट आणि सीरिजमध्ये काम का करतं नाही?” याच उत्तर तिनं समीर चौघुलेंचा एक व्हिडीओ शेअर करून दिलं आहे. ज्यामध्ये समीर चौघुले तोडक मोडक हिंदी बोलताना दिसत आहेत. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत हेमांगीनं लिहीलं आहे की, “हे सत्य घटनेवर आधारित नाहीये….समीर चौघुले तू वेडा आहेस.”
हेही वाचा – Video: “माझे बाबा शंकर भगवान अन् आई…” क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल
हेमांगीच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह नेटकरीनं भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. “खरंच तो बेस्ट आहे. मी माझं हसू थांबवू शकत नाही”, “तू आधीच हिंदीत काम केलं आहेस”, “ताई तू पण ना…एकदम पंच टाक्या..”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress hemangi kavi share samir choughule funny video pps