मराठीतील बोल्ड, ब्युटीफुल आणि बिनधास्त अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. ती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ईशाचा ‘सरला एक कोटी’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. नुकतंच ईशाने तिचा बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
ईशा केसकर ही तिच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. गेल्या काही वर्षापासून ईशा ही अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. ऋषी सक्सेनाचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने तिने त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “वेड चित्रपटासाठी…” ‘सरला एक कोटी’ला स्क्रिन्स आणि प्राईम टाईम शो न मिळाल्याने ईशा केसकर संतापली
ऋषीच्या वाढदिवसानिमित्त ते दोघेही फिरायला गेले आहेत. यावेळीचा एक व्हिडीओ ईशाने शेअर केला आहे. यात ते दोघेही रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना ईशा म्हणाली, “ऋषी सक्सेना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू खरंच सर्वोत्कृष्ट आहेस. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.”
आणखी वाचा : “मला ती आवडली, पण ओंकारला…” ‘सरला एक कोटी’च्या रोमँटिक सीनबद्दल ईशाचा बॉयफ्रेंड स्पष्टच बोलला
ईशा केसकरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत ऋषीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान ईशा आणि ऋषी हे सध्या दोघंही त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यग्र आहे. ऋषीही येत्या काळामध्ये मराठी चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. तर ईशाच्या हातीही काही प्रोजेक्ट्स असल्याचे तिने सांगितले आहे. पण त्यापूर्वी ते दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.