Premium

मराठमोळ्या केतकी माटेगावकरचं नशीब उजळलं; सुपरस्टार अल्लू अर्जुनबरोबर झळकली जाहिरातीत, अनुभव सांगत म्हणाली…

केतकी माटेगावकरने केलं सुपरस्टार अल्लू अर्जुनबरोबर काम, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ…

ketaki mategaonkar work with south superstar allu arjun
केतकी माटेगावकर आणि अल्लू अर्जुन ( फोटो : केतकी इन्स्टाग्राम )

अभिनेत्री केतकी माटेगावकर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाली. तिने ‘तानी’, ‘टाईमपास’ अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता केतकी पुन्हा एकदा नव्या चित्रपटात झळकणार आहे. केतकी माटेगावकर प्रमुख भूमिकेत असलेला ‘अंकुश’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नितीन देसाई यांच्या N.D Studio मध्ये होतंय अक्षरा-अधिपतीच्या लग्नाचं शूटिंग, अनुभव सांगत दोघं म्हणाले, “हा सेट…”

केतकीला एका नामांकित कंपनीच्या जाहिरातीमध्ये थेट दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. अशा दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने केतकीच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं…” प्रिया बापटने शेअर नवऱ्याला किस करतानाचा फोटो, नेटकरी म्हणाले…

केतकी माटेगावकरने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुनबरोबर पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव कसा होता याविषयी सांगितलं आहे. ती लिहिते, “एका जाहिरातीमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो. अल्लू अर्जुनबरोबर पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूपच आनंदी आहे. हा दुर्मिळ योग जुळवून आणल्याबद्दल आभार” या जाहिरातीमध्ये केतकी आणि अल्लू अर्जुनसह मराठी अभिनेते गिरीश कुलकर्णी यांची झलक पाहायला मिळते.

हेही वाचा : बॉबी देओलपेक्षा १४ पट अधिक मानधन; ‘अ‍ॅनिमल’साठी रणबीर कपूरने घेतले ‘इतके’ कोटी

दरम्यान, केतकीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “केतकी खूप छान…तुझी अशीच प्रगती होत राहो”, “जय महाराष्ट्र”, “केतकी रॉक्स”, “केतकी ताई अल्लू अर्जुनबरोबर”, “ग्रेट ताई” अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर केल्या आहेत. केतकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती प्रमुख भूमिका साकारत असलेला ‘अंकुश’ चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress ketaki mategaonkar work with south superstar allu arjun in advertisement shared video sva 00

First published on: 29-09-2023 at 15:50 IST
Next Story
इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्यानंतर रिंकू राजगुरु पोहोचली केदारनाथला, कॅप्शन चर्चेत