सोशल मीडियावरील क्रांती रेडकरचे व्हिडीओ नेहमी चर्चेत असतात. कारण क्रांती तिच्या अनोख्या शैलीत दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या दोन जुळ्या गोंडस मुलींचे व्हिडीओ पाहण्यासाठी तर चाहते आतुरतेने वाटत पाहत असतात. नुकताच क्रांतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये तिनं लेकींचा किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओत क्रांती म्हणतेय, “त्या दिवशी मी छबील आणि गोदोचा अभ्यास घेते होते. तर गोदो खूप पटापट लिहिते. त्या दिवशीही तिचं लिहून झालं होतं. त्यामुळे ती बाजूला स्कूटर स्कूटर खेळत होती. मी छबीलला पी (P) लिहायला शिकवत होते. तिला पी लिहिता येतो. पण तिना उगाच चुकीचा लिहिते. आधी एक गोल काढणार मग त्याला दांडी काढणार. तर मी तिला शिकवत होते. हे बघ छबील नेहमी आधी दांडी काढायची. मग उलटा सी काढायचा. त्यानंतर तो छान पी दिसतो आणि मी हे तुला शेवटचं सांगतेय. आता तू म्हातारी होणार तेव्हा मी नसणार. मी मरून जाणार. पण तेव्हा पण तुला हे लक्षात राहिलं पाहिजे. माझ्या मम्माने मला कसा पी काढायला शिकवलेला, कळलं.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? अभिनेत्याने लिहिली खास पोस्ट, म्हणाले, “माझा हिरो…”

“तर छबील लगेच उदास झाली. ‘नाही मम्मा, तू नाही मरणार. मी तुझी काळजी घेणार आणि तू म्हातारी झालीस तर मी जिवंत ठेवणार मम्मा.’ मग मला असं खूप गदगद वाटली. किती छान छबील. थँक्यू. त्यानंतर लगेच तिकडे असलेली गोदो म्हणाली, ‘जर तू मेलीस तर मी तुला खूप मिस करणार बाबा.’ म्हणजे हिच काय? ही कोण असते? म्हटलं, काय गं गोदो म्हणजे मी मरू. ‘नाही नाही जर तू मेलीस तर. मरणार असं नाही. जर तू मेलीस तर.’ हिचं काय करायचं? ती तीन फुटांची पण नाहीये…तिचं काय चाललंय ते बघा? हे असं आहे,” हा किस्सा क्रांतीने या व्हिडीओतून सांगितला.

हेही वाचा – Video: ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर पुन्हा एकदा ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स, चाहत्यांची जिंकली मनं

क्रांतीच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “गोदोचा विषयचं लय हार्ड आहे बाबा…ती थेट बोलणारी आहे”, “गोदो रॉक क्रांती शॉक”, “ती फक्त प्रॅक्टिकल आहे”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kranti redkar told the story of her girl pps
First published on: 18-06-2024 at 20:45 IST