अभिनेत्री मधुरा वेलणकर ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मधुरा मुख्य भूमिका साकारत असलेला ‘बटरफ्लाय’ चित्रपट येत्या २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला असून चित्रपटाची निर्मिती अजित भुरे, अभिजीत साटम आणि मधुरा वेलणकर यांनी केली आहे.

हेही वाचा : अनुष्का शर्माच्या आयुष्यात ‘या’ २ गोष्टींमुळे झाला बदल, चाहत्यांना सल्ला देत म्हणाली, “रात्रीचे नऊ वाजले की…”

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

मधुरा वेलणकरचा ‘बटरफ्लाय’ चित्रपट एका सामान्य गृहिणीचे जीवन, तिची स्वप्न यावर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मीरा वेलणकरने केले असून पटकथा विभा दिक्षित देशपांडे आणि मीराने लिहिली आहे. ‘बटरफ्लाय’मधील गाण्यांचे लेखन वैभव जोशीने केले आहे. तसेच सुप्रसिद्ध कवी गुरू ठाकूरच्या कविता तुम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहेत.

हेही वाचा : “गौरीने मला कधीच गिफ्ट दिले नाही, कारण…” शाहरुख खानचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल, पत्नीविषयी केला होता मजेशीर खुलासा

‘बटरफ्लाय’मध्ये सामान्य गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे. घरात काम करणारी सामान्य स्त्री ही केवळ ‘हाऊसवाईफ’ नसून ती घराची ‘होममेकर’ असते. “प्रत्येक जण मरणार…पण तुम्हाला माहितीये आपण प्रत्यक्षात कधी मरतो? ज्यावेळी आपली स्वप्न मरतात तेव्हा!” असा संदेश चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते. प्रत्येक गृहिणी आपल्या घरासाठी स्वत:चा विचार न करता मेहनत करीत असते, परंतु आयुष्यात अशी एखादी घटना घडते की, संपूर्ण जीवन बदलून जाते. आयुष्याच्या नव्या वळणावर ही गृहिणी स्वत:लाही प्राधान्य देते असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

चित्रपटात अभिनेत्री मधुरा वेलणकर प्रमुख भूमिकेत दिसेल. याशिवाय, अभिजीत साटम, प्रदिप वेलणकर, सोनिया परचुरे, राधा धरणे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत असून मधुरा वेलणकरला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.