मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिच्या पूर्वाश्रमीच्या पतीने साखरपुडा उरकला आहे. बॉक्सर प्रदीप खरेरा (Pradeep Kharera Engagement) याने विशाखा जाटनी हिच्याशी साखरपुडा केला आहे. विशाखाने एक रील इन्स्टाग्रामवर शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली. त्यांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर मानसी नाईकने केलेल्या पहिल्या पोस्टने लक्ष वेधले आहे. मानसीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. तिची स्टोरी पाहिल्यानंतर लवकरच ती चाहत्यांना काही आनंदाची बातमी देणार का, अशा चर्चा होत आहेत. मानसी नाईकचा पूर्वाश्रमीचा पती बॉक्सर व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर प्रदीप खरेरा मॉडेलिंग क्षेत्रातही काम करतोय. त्याने सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर विशाखा जाटनी हिच्याशी साखरपुडा केला आहे. विशाखाने इन्स्टाग्रामवरील रीलमध्ये या खास सोहळ्यातील काही क्षण शेअर केले आहेत. याच दरम्यान मानसी नाईकने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला साखरपुडा, रोमँटिक व्हिडीओ चर्चेत; प्रदीप खरेराची होणारी पत्नी कोण? जाणून घ्या मानसी नाईकची स्टोरी नेमकी काय? Manasi Naik Story: मानसी नाईकने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या हातातील हिरवा चुडा पाहायला मिळत आहे. हातातील हिरवा चुडा फ्लाँट करताना मानसीने उदित नारायण व अलका याज्ञिक यांचं 'चुडी बजी है कहीं दूर छन छन…' हे गाणं वापरलं आहे. मानसीची ही स्टोरी चांगलीच चर्चेत आहे. मानसी नाईकची इन्स्टाग्राम स्टोरी मानसी नाईकच्या डेटिंगच्या चर्चा मानसी नाईकचा एप्रिल महिन्यात वाढदिवस झाला. तिने पॅरिसमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी मानसीने राहुल खिसमतराव याच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता. तेव्हापासून मानसी व राहुल यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. पण मानसी किंवा राहुल यांनी याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. “बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग मानसी व प्रदीप खरेरा यांचा घटस्फोट मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी जानेवारी २०२१ मध्ये लग्न केलं होतं. सुरुवातीला दोघांच्याही वैवाहिक आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरू होतं, पण नंतर मात्र या दोघांमध्ये सगळं आलबेल नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. नेहमी एकमेकांबरोबर फिरायला जाणारे, फोटो व व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या मानसी व प्रदीप यांनी सोशल मीडियावरून एकमेकांसोबतच्या पोस्ट डिलीट केल्या. अवघ्या दीड वर्षातच त्यांच्या घटस्फोटाची (Manasi Naik Pradeep Kharera Divorce) बातमी आली. मानसीने स्वतःच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती २०२३ मध्ये दिली होती. घटस्फोटानंतर प्रदीप विशाखाशी साखरपुडा करून पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात करतोय.