अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ व मितालीने २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतेच सिद्धार्थ व मितालीच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त मितालीने सिद्धार्थसाठी रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त मितालीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती व सिद्धार्थ लिपलॉक करताना दिसत आहेत. मितालीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले “शांतता ही प्रेमाची एक भाषा आहे. ज्यांना प्रेम आहे त्यांना ती जाणवते आणि मी कृतज्ञ आहे की आम्ही तेवढे भाग्यवान आहोत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. एकत्र राहत आपण ७ वर्ष पुर्ण केली आहेत. तू आहेस म्हणून मी आहे. जसजसे आपलं वय उलटतं जाईल, तसतसे हे जंगल आपल्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी कायम आपल्यासोबत राहो.” मितालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धर्थनेही लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त मितालीसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. सिद्धार्थने त्यांच्या लग्नातला एक फोटो पोस्ट करत लिहिलेले “तीन वर्ष. थ्री चिअर्स. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. आज मी जिथे आहे, त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. तू पाठिशी खंबीरपणे उभी होतीस म्हणून मी आज इथपर्यंत आलो आहे.”

हेही वाचा- “जीवाची घालमेल होईल…”, मराठी अभिनेत्रीने शेअर केला मनोज जरांगे पाटलांचा ‘तो’ फोटो, आरक्षणाबद्दल म्हणाली…

सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले, येत्या २ फेब्रुवारीला त्याचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर सई ताम्हणकरची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना सिद्धार्थ व सईची ‘अरेंजवाली लव्हस्टोरी’ बघायला मिळणार आहे. तर सध्या मिताली शेवटची ‘लाडकी लेक’ मालिकेत झळकली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress mitali mayekar share romantic post for her husband siddharth chandekar on 3rd wedding anniversary dpj
First published on: 26-01-2024 at 17:16 IST