मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून मृण्मयी देशपांडेला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारत अभिनय कौशल्य दाखवलं आहे. आता लवकरच मृण्मयी सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात झळकणार आहे. यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात मृण्मयी ही ललिता देशपांडे हे पात्र साकारत आहे. हा चित्रपट सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित आहे. यात अभिनेते सुनील बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या निमित्ताने लेखक दिग्दर्शक योगेश देशपांडेंने चित्रपटातील कलाकारांना पत्र पाठवलं आहे. त्याचीच झलक मृण्मयीने दाखवली आहे.
आणखी वाचा : “लिहायला उशीर झाला असला तरी…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मृण्मयी देशपांडेची पोस्ट
“ही दिवाळी खऱ्या अर्थाने लक्षात राहील… आणि योगेश.. तुझ्याबद्दल काय बोलू? इतक्या प्रेमाने तू सगळ्या टीम ला बांधून ठेवलं आहेस.. हे पत्र मी फ्रेम करुन ठेवणार आहे…
माझ्या मधे तू ललिता बाईंना पाहीलस .. आणि तुझ्या मुळे मी त्यांना सिनेमा च्या माध्यमातून भेटले… जगले… तुला फक्त thank you म्हणू शकते… आता पडद्या वरती सगळ्यांना बघायची वाट बघते आहे… ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’”, असे मृण्मयी देशपांडेने म्हटले आहे.
दरम्यान ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुनील बर्वे यांच्याव्यतिरिक्त सागर तळाशीकर (ग. दि. माडगूळकर), मिलिंद फाटक (राजा परांजपे), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), धीरेश जोशी (वीर सावरकर), शरद पोंक्षे (डॉ. हेडगेवार) ही कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिका़त दिसणार आहेत. योगेश देशपांडे या चित्रपटाच्या लेखन व दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.