मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहिलात का? नवऱ्यासह सुरू केला नवा व्यवसाय
कलाकार मंडळी नेमकं कसं आयुष्य जगतात? त्यांचं राहणीमान, त्यांची प्रत्येक महागडी वस्तू याबाबत जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक रस असतो. सोशल मीडियाद्वारे तर बरीच कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत माहिती देताना दिसातत. त्यातीलच एक कलाकार म्हणजे मृण्मयी देशपांडे. मृण्मयी सध्या महाबळेश्वरमध्ये राहत आहे. निसर्गाच्या सानिध्यात छोटसं घर बांधलं असल्याचं मृण्मयीने मध्यंतरी एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
मृण्मयी आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मृण्मयीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे ती शेतीविषयक काही माहिती देताना दिसत आहे. मृण्मयी व तिचा पती स्वप्निल महाबळेश्वरमध्ये शेती करत आहेत. स्वतः दोघंही या शेतामध्ये काम करतात. आता या दोघांनी मिळून एक नवा व्यवसाय सुरू केला आहे.
पर्मा कल्चर (शेतीविषयक कोर्स) हा तीन दिवसांचा कोर्स मृण्मयीने महाबळेश्वरमध्ये आयोजित केला आहे. या कोर्सद्वारे छोट्या जागेमध्ये शेती कशी करायची, स्वतःसाठी शेती कशापद्धतीने करावी अशा अनेक गोष्टी यामधून शिकता येणार आहेत. या कोर्समध्ये मृण्मयीसह तिचा पतीही तिची साथ देणार आहे. मृण्मयीने व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण कोर्स विषयी माहिती दिली आहे.
तीन दिवसांच्या या कोर्सची फी सात हजार रुपये आहे. यामध्ये राहण्याची व जेवणाची सोयही असणार आहे. नेटकऱ्यांनी मृण्मयीचा हा व्हिडीओ पाहून तिचं कौतुक केलं आहे. शेतीचं खूप मोठं काम तुम्ही करत आहात, खूपच नाविन्यपूर्ण उपक्रम, आम्हाला तुझा अभिमान आहे अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.