Girija Oak Short Hair New Look : अभिनेत्री गिरिजा ओक गेल्या काही महिन्यांपासून ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावारुपाला आली आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. काही महिन्यांपूर्वी गिरिजाचे निळ्या साडीतले फोटो तुफान व्हायरल झाले होते. यानंतर सर्वजण तिला ‘न्यू नॅशनल क्रश’ म्हणू लागले. गिरिजा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दल, वैयक्तिक आयुष्याबाबत तसेच सामाजिक कार्याबद्दलच्या अनेक अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, या सगळ्यात गिरिजाने शेअर केलेल्या एका फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गिरिजाचा बदललेला, नेहमीपेक्षा काहीसा वेगळा आणि नवीन लूक या फोटोमध्ये पाहायला मिळतोय. गिरिजाने तिची हेअरस्टाइल बदलली आहे. शॉर्ट हेअर्समध्ये अभिनेत्री खूपच गोड दिसतेय. गिरिजाचे केस लांबसडक होते, यानंतर मध्यंतरी गिरिजाने Curtain bangs हेअरकट केला होता आणि आता नुकत्याच समोर आलेल्या फोटोमध्ये गिरिजा शॉर्ट हेअर्समध्ये दिसतेय. गिरिजाचा हा हटके लूक पाहून चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
गिरिजा सध्या अमेरिकेत आहे. ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल’ला उपस्थित राहण्यासाठी ती अमेरिकेला गेली आहे. याचदरम्यान गिरिजाने रेड कार्पेटवर एका नव्या लूकसह एन्ट्री घेतली. रेड कलरचा सुंदर वनपीस, शॉर्ट हेअर्स या लूकमध्ये गिरिजा खूपच गोड दिसत होती. सुरुवातीला चाहत्यांना वाटलं की, अभिनेत्रीने फक्त नाफा फेस्टिव्हलसाठी ही खास हेअरस्टाइल केलीये. मात्र, तिने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केलीये, यामध्येही गिरिजाचा शॉर्ट हेअर लूकमध्ये पाहायला मिळतेय.
“वॉव क्युट असेच हेअर्स ठेवा”, “केस का कापले?”, “शानदार अंदाज”, “तुम्ही खूप गोड दिसताय मॅम”, “वॉव गिरिजा मस्त दिसतेय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.


दरम्यान, गिरिजा नुकतीच ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमात झळकली. या सिनेमाची निर्मिती कंगना रणौतच्या मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली करण्यात आली होती. १२ जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता आणि आता हा चित्रपट प्रेक्षक ZEE5 वर पाहू शकतात.
