मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री पूजा सावंत हिच लग्नानंतरचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. पूजा सावंतच्या या नव्या गाण्याच नाव 'नाच गो बया' असून सध्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नव्या गाण्यामध्ये पूजा सावंतसह अभिनेत्री अक्षया नाईक, आकांक्षा गाडे, आयुष संजीव, निक शिंदे आणि तश्वी भोईर झळकली आहे. या तगड्या कलाकारांच्या नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी लोकप्रिय आशिष पाटील आणि चेतन महाजनने सांभाळली होती. प्रशांत नेटके संगीतबद्ध केलेलं 'नाच गो बया' गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे. अनेक कलाकार मंडळी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पण पूजा सावंतच्या नऊवारी साडीतील डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "आमचं नवीन गाणं आलं", असं कॅप्शन देत पूजा सावंतने 'नाच गो बया' गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, पूजा सावंत लाल रंगाच्या नऊवारी साडीत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलने पूजाची साथ दिली आहे. दोघांचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. चाहत्यांनी पूजाच्या डान्ससह तिच्या एक्सप्रेशनचं कौतुक केलं आहे. हेही वाचा - Video: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील परफॉर्न्ससाठी बादशाहने घेतलं ‘इतकं’ मानधन, बॉलीवूड सेलिब्रिटींसह पंड्याही थिरकला रॅपरच्या गाण्यांवर View this post on Instagram A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) पूजा सावंतच्या या डान्स व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. विजू माने, अमृता बने, सुकन्या मोने, वनिता खरा, स्वानंद बेर्डे, योगिता चव्हाण, निखिल बने, वल्लरी विराज, गौरी नलावडे, साक्षी गांधी, गिरीजा प्रभु अशा अनेक कलाकारांनी पूजाचा व्हिडीओला लाईक केलं असून त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेही वाचा – Video: दुसऱ्या पत्नीविषयी ‘ती’ कमेंट ऐकून भडकला अरमान मलिक अन् लगावली विशाल पांडेच्या कानशिलात, नेमकं काय घडलं? जाणून घ्या… दरम्यान, पूजा सावंतचं 'नाच गो बया' गाणं ५ जुलैला प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला आतापर्यंत युट्यूबवर ३ लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. तर १२ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. तसंच, "खूप छान गाणं झालंय", "सर्व महिलांनी एकत्र येऊन खूप छान डान्स केला", "अतिशय उत्तम संकल्पना", अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या उमटल्या आहेत.