मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील टॉप ५ पैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. प्राजक्ता ही लवकरच ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच प्राजक्ताने या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला आहे.
प्राजक्ता माळी ही ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाच्या शूटींगसाठी लंडनला गेली होती. ती लंडनला जाण्यासाठी फारच उत्सुक होती. त्यामागची दोन कारण होती. यातील एक म्हणजे लंडनमध्ये चित्रीकरण होते आणि दुसरे म्हणजे तिला सौंदर्यप्रसाधनांची आणि इतर बऱ्याच वस्तूंची खरेदी करायची होती. यासाठी ती भरपूर पैसेही घेऊन गेली होती. मात्र तिची निराशा झाली.
आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”
“मला लंडनमध्ये खूप खरेदी करायची होती. परंतु माझे चित्रीकरणाचे शेड्युल असे होते, की मला खरेदीसाठी वेळच मिळायचा नाही. माझा शॉट अर्धा तासासाठी असला तरी माझा पूर्ण दिवस जायचा. अखेर जायच्या आधी मला केवळ अर्धा दिवस शॉपिंगसाठी मिळाला. त्यात मी माझ्या भाच्यांसाठी आणि जमेल त्या वस्तू खरेदी केल्या.
पण मनासारखी खरेदी न झाल्याने माझे बरेच पैसे उरले. त्यात अभिनेता आलोक राजवाडेचे कार्ड बंद पडले होते. आलोकला गरज होती म्हणून माझ्याकडचे पैसे त्याला दिले. अर्थात आलोकने ते पैसे परतही केले”, असा किस्सा प्राजक्ता माळीने सांगितला.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?
दरम्यान प्राजक्ता माळी
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali could not buy anything at london know the reason behind nrp