मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, नृत्यांगना आणि निवेदक सुद्धा आहे. एवढंच नाही तर ती एक चांगली व्यावसायिका देखील आहे. सध्या प्राजक्ता तिच्या एका ग्लॅमरस लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४ पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला मराठीतील अनेक अभिनेत्रींचा एक वेगळा, हटके अंदाज पाहायला मिळाला. प्राजक्ता माळीने देखील या पुरस्कार सोहळ्याकरीता ग्लॅमरस लूक केला होता; ज्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील गावकऱ्याला वाचवण्याचा सीन ‘असा’ झाला होता चित्रीत, सुमीत पुसावळेनं शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्री प्राजक्ता माळीने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी मेटालिक हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर तिनं मोकळे केस सोडल्यामुळे ती अजून बोल्ड आणि हॉट दिसत होती. या ड्रेसवरचे फोटो प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं आहे, “ज्या फोटोशूटचा व्हिडीओ पाहिलात, ते फोटोज्.”

प्राजक्ताचे हे ग्लॅमरस, बोल्ड आणि हॉट फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडला आहे. “खतरनाक”, “स्टनिंग लूक”, “तू अशक्य सुंदर आहेस,” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यंनी प्राजक्ताच्या पोस्टवर दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तू कुठलाही ड्रेस परिधान केला किंवा साडी नेसली तरी त्या बॉलीवूडवाल्यांना फिक करते.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तापमान आधीच काय कमी वाढलंय, ज्यात तू अजून वाढ करतं आहेस.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुम हुस्न परी तुम जाने जहां, तुम सबसे हसीं, तुम सबसे जवाँ.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “नुसता जाळ अन् धूर…”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने शेअर केलेला ऑस्ट्रेलियातील ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकला प्रसाद खांडेकर, म्हणाला…

दरम्यान, प्राजक्ताच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘भिशी मित्र मंडळ’ या चित्रपटात ती झळकणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. याशिवाय प्रसाद खांडेकरच्या नव्या चित्रपटात देखील प्राजक्ता पाहायला मिळणार आहे.