Phulwanti Movie: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) मुख्य भूमिका असलेला ‘फुलवंती’ चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघा एक महिना बाकी आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील प्राजक्ताचा लूक रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटातील व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेतील अभिनेत्याचे लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमधील अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का?

छत्रपतींनंतर मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. त्यांच्या दरबारात एकापेक्षा एक धुरंदर होते. त्यातील एक म्हणजे सकल शास्त्रपारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री! पेशव्यांच्या दरबारात त्यांना खूप महत्त्वाचे स्थान होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात ११ ॲाक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा मराठीती आघाडीचा अभिनेता साकारणार आहे.

हेही वाचा- दारूची नशा, सिगारेटचे चटके अन्…; नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यावर राज कपूर यांची ‘अशी’ झाली होती अवस्था

व्यंकट शास्त्री यांच्या भूमिकेत गश्मीर महाजनी

व्यंकट शास्त्री यांची भूमिका अभिनेता गश्मीर महाजनी याने साकारली आहे. तसेच ‘फुलवंती’ या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता माळी दिसणार आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/09/gashmeer-mahajani.mp4
नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत गश्मीर महाजनी

२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम

‘फुलवंती’ पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत. मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित हा चित्रपट ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.