scorecardresearch

Premium

“यावर्षीचे देखावे…” पुण्यातील गणपती दर्शनानंतर प्रिया बेर्डेंची पोस्ट, म्हणाल्या “तो योग आज…”

त्यांच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे.

priya berde
प्रिया बेर्डे

दरवर्षीप्रमाणे पुण्यात मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी कायमच भाविक गर्दी करतात. नुकतंच पुण्यातील याच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी अभिनेत्री प्रिया बेर्डे दाखल झाल्या आहेत. त्यांनी यानिमित्ताने काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्रिया बेर्डे या नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये सक्रिय असतात. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला. प्रिया बेर्डे या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी पुण्यातील गणपती दर्शनाचे फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, म्हणाली “आमच्या आयुष्यातील…”

viju mane
“आम्ही एक वडापाव…”, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने सांगितल्या संघर्ष काळातील आठवणी, म्हणाले “दुधासाठी पैसे…”
rinku rajguru
अखेर रिंकू राजगुरुने स्पष्ट केलं इन्स्टाग्राम पोस्ट गायब होण्यामागचं कारण, म्हणाली, “आता सगळं…”
vishakha
“कार्यक्रमात माझ्या जाडेपणाबद्दल विनोद केले तर…”, विशाखा सुभेदार स्पष्टच बोलल्या, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं उदाहरण देत म्हणाल्या…
amitabh-bachchan-mere-angane-mein
‘केबीसी १५’च्या मंचावर ‘मेरे अंगने में’ गाणं लागताच बिग बी ओशाळले; सांगितला गाण्यामागचा धमाल किस्सा

“आज मी पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे दर्शन घेतले..गेली अनेक वर्षे या सर्व गणपतींचे दर्शन घ्यावे असं वाटत होतं तो योग आज आला, काय कमाल वातावरण होतं, अक्ख पुणे गणपतीमय झालंय, यावर्षी चे गणेशाचे देखावे जास्तीत जास्त मंदिरांच्या प्रतिकृती आहेत, सगळ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन एकट्या पुण्यात मिळाले.

कसबा गणपती ,तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग ,केसरी वाडा,श्रीमंत दगडूशेठ गणपती,मंडई गणपती,भाऊ रंगारी यांचे दर्शन घेतले. त्याच बरोबर पोलीस प्रशासन, बाऊन्सर्स,सर्व मंडळाचे कार्यकर्ते यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. किती कष्ट आहेत त्यांचे, हा उत्सव उत्तम साजरा होण्यासाठी, सर्व भक्त गणासाठी ही सर्व मंडळी दिवसरात्र उभे आहेत त्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद दिलेच पाहिजेत.

आज माझ्या बरोबर पुणे शहर अध्यक्ष श्री. जतीन पांडे, गौरी वनारसे, इ. भारतीय जनता पार्टी च्या सांस्कृतिक प्रकोष्ठचे पदाधिकारी उपस्थित होते”, असे कॅप्शन प्रिया बेर्डे यांनी दिले आहे.

आणखी वाचा : “लालबागचा राजा, मुंबईचा राजा किंवा दुसरा बाप्पा हा एकच…” नम्रता संभेरावचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाली “आतासारखे सेलिब्रिटी स्टेट्स…”

दरम्यान प्रिया बेर्डे यांचे गणपती दर्शनाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. तसेच या फोटोवर लाईक्सचाही पाऊस पडताना पाहायला मिळत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress prreeya berde visit pune ganpati festival share photos nrp

First published on: 27-09-2023 at 18:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×