‘सैराट’या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगूरु सध्या चांगलीच चर्चेत आहे. रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतचं रिंकूने केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाच दर्शन घेतलं.

हेही वाचा- “हे माझं स्वप्न नव्हतं, पण…”, ऋतुजा बागवेने सांगितलं नवीन घर खरेदी करण्याचं कारण, म्हणाली…

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”

रिंकूने केदारनाथ सहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत रिंकूने लिहिलं आहे ‘कधीही विसरता न येणारा प्रवास. या व्हिडिओमध्ये रिंकूने केदारनाथच्या सहलीदरम्यान केलेल्या गोष्टी दाखण्यात आल्या आहेत. रिंकूची ही पहिलीच स्वतंत्र ट्रीप आहे. या ट्रीपमध्ये रिंकू खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहे. हा व्हिडिओ बघून अनेक चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एकाने ‘जुनी अर्ची कुठे गेली’? असा प्रश्न विचारला आहे. तर अनेकांनी ‘हर हर महादेव’ अशी कमेंट केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच रिंकूने केदारनाथ मंदिराबाहरेचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा फोटो शेअऱ करत रिंकूने ‘हर हर महादेव’ असं कॅपशन दिलं होतं. यावेळी रिंकूने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्याबरोबरच तिने अंगावर शालही घेतली होती. तिचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला होता.

हेही वाचा- “तू हिंदी चित्रपट, सीरिजमध्ये काम का करत नाहीस?” हेमांगी कवीने समीर चौघुलेंचा व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर…

रिंकू ही आर्ची म्हणून घराघरात लोकप्रिय झाली. त्यानंतर ती ‘हंड्रेड’ या वेबसीरिजमध्येही झळकली. रिंकूने ‘कागर’, ‘झुंड’, ‘मेकअप’, ‘रंग प्रेमाचा’ या चित्रपटात काम केले. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र अद्याप याबद्दल घोषणा झालेली नाही.