दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. तिचा हा पहिला चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे ती घराघरात पोहोचली. सध्या रिंकू ही ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यात आता रिंकूने तिला कशी सासू हवी, याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरुला ‘आर्ची’ या नावाने ओळखले जाते. रिंकूने ‘झिम्मा २’ या चित्रपटात तानिया हे पात्र साकारलं आहे. यात ती निर्मिती सावंत यांच्या सुनेची भूमिका साकारताना दिसत आहे. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे.
आणखी वाचा : “रिंकूने मला थांगपत्ताच लागू दिला नाही की ती…”, सायली संजीवने सांगितला किस्सा, म्हणाली “त्या काळात आमची मैत्री…”
त्यातच आता रिंकूने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने निर्मिती सावंत यांच्याबरोबरचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना रिंकूने लग्नापूर्वी तिला कशी सासू हवी, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
“माझं लग्न झालेल नाही पण,सासू पाहिजेल तर अशी, UNO UNO UNO!!!”, असे रिंकू राजगुरुने म्हटले आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
आणखी वाचा : रिंकू राजगुरुच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट झाल्या गायब, कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान रिंकूच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी “खूप छान जोडी”, “परफेक्ट जोडी”, “रिंकू तुला नक्की मिळेल अशी सासू”, “तथास्तु”, अशा प्रतिक्रिया या पोस्टवर दिल्या आहेत. सध्या ‘झिम्मा २’ हा चित्रपट सर्वत्र सुपरहिट ठरताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतानाही पाहायला मिळत आहे.