Premium

इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्यानंतर रिंकू राजगुरु पोहोचली केदारनाथला, कॅप्शन चर्चेत

रिंकू राजगुरुने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट डिलीट होत्या.

rinku rajguru kedarnath
रिंकू राजगुरु

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. याच चित्रपटातून तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केले. तब्बल सात वर्ष उलटून गेली तरीही सामान्य लोक तिला ‘आर्ची’ याच नावाने ओळखतात. रिंकू राजगुरुने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट डिलीट होत्या. आता रिंकूने केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिंकू राजगुरु ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिच्या फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसते. नुकतंच रिंकूने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : “ढोल वादन संपल्यानंतर…”, सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडितची झाली ‘अशी’ अवस्था, फोटो समोर

यावेळी रिंकूने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्याबरोबरच तिने अंगावर शालही घेतली होती. तिचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. रिंकूने या फोटोला ‘हर हर महादेव’ असे कॅप्शन दिले आहे.

रिंकूच्या या फोटोवर सायली संजीवने कमेंट केली आहे. तिने ‘हर हर महादेव’ अशी कमेंट केली आहे. त्यावर रिंकूनेही हात जोडतानाचा इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

आणखी वाचा : शिव ठाकरेने चाहत्याची मागितली जाहीर माफी, कारण…

रिंकू ही आर्ची म्हणून घराघरात लोकप्रिय झाली. त्यानंतर ती ‘हंड्रेड’ या वेबसीरिजमध्येही झळकली. रिंकूने ‘कागर’, ‘झुंड’, ‘मेकअप’, ‘रंग प्रेमाचा’ या चित्रपटात काम केले. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र अद्याप याबद्दल घोषणा झालेली नाही.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress rinku rajguru visit kedarnath after deleting her instagram posts nrp

First published on: 29-09-2023 at 15:46 IST
Next Story
“सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं…” प्रिया बापटने शेअर नवऱ्याला किस करतानाचा फोटो, नेटकरी म्हणाले…