मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकर हीचं नाव कायमच वरच्या स्थानी असतं. आता फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. मात्र नुकतंच सईने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

सई ताम्हणकरने नुकतंच एका इंग्रजी युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला काही सेकंदात प्रश्न विचारण्यात आले, ज्याची तिला उत्तर द्यायची होती. यावेळी मुलाखतीत तिला इंग्रजीत प्रश्न विचारल्याने तिनेही इंग्रजीत उत्तर दिली आहे. मात्र सई यात इंग्रजी बोलत असल्याने काही चाहत्यांना ते खटकलं आहे. यामुळे आता सईला मराठी न बोलल्यामुळे ट्रोल करण्यात आलं आहे.
आणखी वाचा : “घरी भाजी न आवडल्याची तक्रार केली, तर…” सई ताम्हणकरने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

सईच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “मराठीत सांगितले असते तर पूर्ण समजले असते, English+Marathi= आमची गोची झाली बघा”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “मराठी मध्ये बोलले असते तर काय झाले आस्ते, आप्ल्या भाषेत बोलायला लाज वाटते?” असे एकाने म्हटले आहे. त्यावर सईने कमेंट करत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

“हे एक इंग्रजी चॅनेल आहे. तुम्ही आधी नीट माहिती मिळवा, त्यानंतर बोला. आणि आम्ही कोणत्या भाषेत बोलायचं हे ठरवण्याचा हक्क तुम्हाला नाही”, असे सई ताम्हणकरने म्हटले आहे. तिच्या या उत्तरामुळे ट्रोलर्सची तोंड बंद झाली आहेत.

sai tamhankar comment
सई ताम्हणकर

आणखी वाचा : सई ताम्हणकरने तिचं नवीन घर कसं शोधलं? म्हणाली “मला लॉकडाऊनमध्ये…”

दरम्यान सईने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘तू हि रे’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये सईने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सई सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सईने मुंबईत तिचं पहिलं घर घेतलं आहे.

Story img Loader