मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. सई सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सईने मुंबईत तिचं पहिलं घर घेतलं आहे. नुकतंच तिने तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल सांगितले.
सई ताम्हणकरने तिच्या युट्यूबवर नवीन आणि जुन्या घराचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात तिने नवीन घराची झलक दाखवली आहे. यावेळी तिने आई-वडील आणि कुटुंबाच्या पाठिंबाबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : सई ताम्हणकरने तिचं नवीन घर कसं शोधलं? म्हणाली “मला लॉकडाऊनमध्ये…”
“माझ्या आई-वडिलांचा आणि कुटुंबाचा मला प्रचंड पाठिंबा होता. ते कधीही किंतू-परंतु मनात ठेवायचे नाहीत. ते कायम मला ‘तू कर ग’, असं म्हणायचे. त्यामुळे मला कायमच एक वेगळंच बळ मिळालं”, असे सई ताम्हणकर म्हणाली.
“त्यातून मला एक वेगळीच उर्जा मिळत असते. आई-वडील, कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा नसेल तर आयुष्यच सुरु होऊ शकत नाही. तर मग घर कसं होईल?” असेही ती म्हणाली.
आणखी वाचा : “घरी भाजी न आवडल्याची तक्रार केली, तर…” सई ताम्हणकरने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली…
सई तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी २००५ मध्ये मुंबईत आली. सांगलीत तिचं संपूर्ण बालपण गेलं. तेव्हापासून सई आई-बाबांच्या, नातेवाईकांच्या आणि भाड्याच्या अशा एकूण १० घरांमध्ये राहिली. त्यामुळे नव्या घराला अभिनेत्रीने ‘माय इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे.