मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सईने मुंबईत तिचं पहिलं घर घेतलं आहे. त्याचे काही व्हिडीओ शेअर करत तिने घराची झलकही दाखवली आहे. आता सईने तिच्या घराबद्दल वक्तव्य केले आहे.

सई ताम्हणकरने तिच्या युट्यूबवर तिच्या नवीन आणि जुन्या घराचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत तिने नवीन घरात आल्यानंतर तिला कसं वाटत, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : सई ताम्हणकरने तिचं नवीन घर कसं शोधलं? म्हणाली “मला लॉकडाऊनमध्ये…”

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole urged district residents to support Gondia Mahavikas Aghadi in campaign
‘या’ जिल्ह्यातील माणूस मुख्यमंत्रीपदी नाना पटोले म्हणतात,’ फडणवीसांचा रडीचा डाव…’

“मी आतापर्यंत ज्या घरात राहिली आहे, त्या घराने मला काही ना काही तरी दिलं आहे. आतापर्यंत १० ठिकाणी मी राहिले. आता नव्या ठिकाणाहून नवीन प्रवास सुरु करायला मी फारच उत्सुक आहे.”

“आम्ही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करु. जेव्हा मी इथे सामान शिफ्ट केलं आणि राहायला आले, तेव्हा मी या घराला सांगितलं, माझ्याशी चांगलं वाग. आपण दोघंही मिळून छान आठवणी तयार करु. स्वप्न पाहू”, असे सई ताम्हणकर म्हणाली.

आणखी वाचा : “घरी भाजी न आवडल्याची तक्रार केली, तर…” सई ताम्हणकरने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली…

“मी तुम्हाला खरं सांगू का तर अजूनही मला हे घर माझं आहे, असं वाटत नाही. मला असचं वाटतंय की उद्या चावी देऊन चेकआऊट करायचं. पण थोडे दिवसात सवय होईल. मला स्वत: चा खूप अभिमान वाटतोय”, असे सई ताम्हणकरने सांगितले.

दरम्यान सई ताम्हणकर ही मूळची सांगलीची असली तरी आता ती खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. सई तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी २००५ मध्ये मुंबईत आली. सांगलीत तिचं संपूर्ण बालपण गेलं. तेव्हापासून सई आई-बाबांच्या, नातेवाईकांच्या आणि भाड्याच्या अशा एकूण १० घरांमध्ये राहिली. त्यामुळे नव्या घराला अभिनेत्रीने ‘माय इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे.