सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने मराठीसह बॉलीवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘तू हि रे’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये सईने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय बॉलीवूडच्या ‘मिमी’ चित्रपटात तिने अभिनेत्री क्रिती सेनॉनबरोबर काम केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “‘ती’ भिती ‘सुभेदार’ने खोडून काढली”, विराजस कुलकर्णीने मांडलं मत, म्हणाला, “मोठा हिंदी चित्रपट…”

‘मिमी’ चित्रपटासाठी सई ताम्हणकरला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा मानाचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला होता. या चित्रपटात सईने क्रिती सेनॉनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. लागोपाठ फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कार जिंकल्यावर बॉलीवूडसह मराठी प्रेक्षकांनी सईने साकारलेल्या भूमिकेचं भरभरून कौतुक केलं होतं. या यशानंतर मराठमोळी सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

हेही वाचा : ‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकर मांडणार मराठवाड्याच्या संघर्षाची कथा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या कलाकृतीचा शुभारंभ

सईने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिच्या नव्या बॉलीवूड प्रोजेक्टची माहिची दिली. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये दिग्दर्शक फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या पत्राचा खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये “प्रिय सई, तुझ्याबरोबर पुन्हा एकदा काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आणि आनंदी आहोत. आमच्या नव्या टीममध्ये तुझं मनापासून स्वागत… लवकरच एका नव्या आणि हटके प्रवासाला सुरुवात करूया” असं या पत्रात लिहिलेलं आहे. पत्राच्या शेवटी एक्सेल एंटरटेनमेंटचा लोगो स्पष्टपणे दिसत असून अभिनेत्रीने चित्रपटाचं नाव उघड केललं नाही.

हेही वाचा : गश्मीर महाजनीचा आवडता मराठी दिग्दर्शक कोण? अभिनेत्याने एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाला, “बाकी कुणीच…”

सई ताम्हणकर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटसह नेमक्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या एक्सेल एंटरटेनमेंट ‘फुक्रे ३’ आणि ‘डॉन ३’ या चित्रपटांसाठी काम करत आहे. त्यामुळे मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी कोणत्या चित्रपटात लागणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. दरम्यान, ‘मिमी’ चित्रपटाआधी सईने ‘गजनी’ आणि ‘हंटर ’यांसारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sai tamhankar to be play important role in farhan akhtar next movie in bollywood sva 00
First published on: 18-09-2023 at 14:24 IST