अभिनेत्री सायली संजीव ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसंच तिच्या कामामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच तिचा ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. त्याच बरोबरीने ती एका ऐतिहासिक चित्रपटातदेखील झळकली होती. त्या चित्रपटाचे नाव होते हर हर महादेव, या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने राजकारणाबद्दल खुलासा केला होता.
सायली संजीव ही चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत साकारलेली प्रत्येक भूमिका ही वैविध्यपूर्ण असून प्रत्येक कामात ते तिचं काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने एका माध्यमाला मुलाखत दिली होती तेव्हा तिने राजकीय प्रवेशाबद्दल सांगितले होते. ती म्हणाली, “मी १८ वर्षाची होणार तेव्हाच मी आधार कार्ड, पॅन कार्ड काढण्याच्या आधीच मी एक राजकीय पक्षात प्रवेश केला होता. कारण आपण नेत्यांना निवडून देतो मग ते आमदार होतात त्यानंतर ते आपली कामं करत नाहीत मग आपण त्यांना नाव ठेवतो.
“तुमचा मृत्यू झाला अन्…” महात्मा गांधींचा फोटो शेअर करत राम गोपाल वर्माचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
ती पुढे म्हणाली, “मला कायम असं वाटतं दुसऱ्यांना नाव ठेवण्यापेक्षा आपण स्वतः यात पडून समाजासाठी काहीतरी करावं. दुसऱ्यांना सतत नाव ठेवण्यापेक्षा आपण जबाबदारी घेतली पाहिजे. मी स्वतः राज्यशास्त्राची विद्यार्थिनी आहे.” अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.
सायली संजीवने ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने ‘बस्ता’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘दाह’, ‘झिम्मा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. ती सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते.