मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. अभिनयाच्या जोरावर सायलीने प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सायली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. निरनिराळे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. आता नुकत्याच एका मुलाखतीत सायलीने तिचे लग्नाचे प्लॅन्स सांगितले आहेत. तसेच तिला होणारा नवरा कसा हवा याबद्दल खुलासा केला आहे.

हेही वाचा- “अंतिम सामना वानखेडेलाच पाहिजे”, भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवानंतर ‘या’ मराठी कलाकारांचं मत

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

सध्या सायली तिच्या अगामी चित्रपट ‘झिम्मा २’मुळे चर्चेत आहे. गेले अनेक दिवस सायली या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नुकतीच तिने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगबाबत आणि होणारा नवरा कसा हवा? याबाबत सांगितलं आहे.

सायली म्हणाली, “आपण आपल्या बॉयफ्रेंड आणि नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांना बघत असतो. कारण त्या व्यक्तीइतकं प्रेम आपण दुसरं कोणावर करू शकत नाही, त्यामुळे तीच इमेज आपण आपल्या लाईफपार्टनरबरोबर बघत असतो. कारण आपण आपल्या आयुष्यातले २०-३० वर्ष ज्या व्यक्तीबरोबर घालवले, त्या व्यक्तीवर आपण प्रेम करत असतो. जितकं प्रेम आपले वडील आपल्यावर करतात, तितकं प्रेम आपल्या नवऱ्याने केलं तर चांगलच आहे. माझ्या वडिलांनी माझ्यावर जेवढं निस्वार्थी आणि खरेपणाने प्रेम केलं, तसं प्रेम मिळालं तर मी आत्ता लग्नाला उभी राहीन.”

हेही वाचा- लग्नानंतर अमृता देशमुखने नवरा प्रसादकडे ‘ही’ इच्छा केली व्यक्त, म्हणाली, “फक्त तू…”

सायलीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मालिका, चित्रपटांमधून सायलीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून सायली घराघरांत पोहचली. ‘बस्ता’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘दाह’, ‘झिम्मा’ सारख्या चित्रपटांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली. आता तिचा ‘झिम्मा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader