मराठी सिनेसृ्ष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत अभिनेत्री शिवानी सुर्वे हे नाव कायमच आघाडीवर असतं. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन २ मुळे ती चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी शिवानी हेमंत ढोमेच्या ‘सातारचा सलमान’ या चित्रपटात झळकली होती. यादरम्यान शूटींगचा एक किस्सा तिने सांगितला आहे. शिवानी सुर्वे हिने या चित्रपटाच्या निमित्त एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'सातारचा सलमान' या चित्रपटाच्या वेळी घडलेला एक किस्सा सांगितला. "मला हा किस्सा सांगताना खरतंर मलाच माझी लाज वाटतेय, पण तरीही हा किस्सा मला तुम्हाला सांगावासा वाटतोय", असे शिवानी सुर्वे म्हणाली.आणखी वाचा : “माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता…” शिवानी सुर्वेचा आगामी चित्रपटातील नवा डॅशिंग लूक समोर "आम्ही या चित्रपटातील एका दृष्याचे चित्रीकरण करत होतो. त्यावेळी मी समोरुन चालत येतेय असे त्यात होते. मला तेव्हा फार छान दिसायचं होतं. त्यावेळी अचानक हेमंत समोरुन माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, 'तुझं कुठे दुसरीकडे शूटींग सुरु होतं का?' त्यावर मी त्याला 'नाही' म्हणाले. यानंतर हेमंत म्हणाला, 'मग तू पार्लरला वैगरे जायचं विसरली आहेस का? ती मिशी काढून ये आधी', असं त्याने मला म्हटलं. यावर मी त्याला 'हो का, असे म्हणत शूटींगदरम्यान अपरलिप्स केले होते." असे शिवानी सुर्वेने म्हटले. "ती माझी चांगली मैत्रीण आहे, म्हणून मी तिला हे सांगू शकलो. कारण माझ्या घरात माझी बायको आणि माझी बहिण घरी मिशी वाढली आहे, जरा पार्लरला जायला हवं, असंच म्हणतात. त्यामुळे मला त्यात काहीही वाटलं नाही", असेही त्याने सांगितले. आणखी वाचा : Video : शाहरुख खानने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार, नंबर प्लेट आहे खास दरम्यान, 'सातारचा सलमान' या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत अशी तगडी स्टारकास्ट आहे. शु्क्रवारी ३ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला.