scorecardresearch

Video: …अन् अमरावतीच्या अंबाबाई मंदिरासमोर सोनाली कुलकर्णीचा गोंधळ; व्हिडीओ व्हायरल

सोनाली कुलकर्णीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

sonalee kulkarni dance video
सोनाली कुलकर्णीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अप्सरा अशी ओळख मिळवलेल्या सोनालीने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावलं. सोनालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नखरेल अदांनी अप्सरा चाहत्यांना अनेकदा घायाळ करताना दिसते.

सध्या सोनाली महाराष्ट्र टुरिझम या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करुन प्रेक्षकांना करुन देते. या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात सोनालीने अमरावतीला भेट दिली. अमरावतीची खाद्यसंस्कृती व वेगवेगळ्या जागांची माहिती या व्हिडीओतून तिने दिली आहे. याबरोबरच सोनालीने अमरावतीमधील प्रसिद्ध अशा अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे यावेळी तिने मंदिरासमोर गोंधळही घातला.

हेही वाचा>> “…त्यानंतर मी चार दिवस जेवलो नाही”, ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशानंतर प्रसाद ओकची अशी झालेली अवस्था, म्हणाला “लोकांना…”

हेही वाचा>> “सेक्सी व्हिडीओ पाठव” म्हणणाऱ्या नेटकऱ्याला मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली “तुझ्या…”

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली गोंधळींबरोबर गोंधळ घालताना दिसत आहे. “अंबादेवी मंदिरासमोर गोंधळींसोबत उत्स्फुर्तपणे गोंधळात सामिल होताना…”, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. सोनालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> “चांगला माणूस पण वाईट…” सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कॉमेडियन कपिल शर्माबाबत केलेलं विधान चर्चेत

सोनालीने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटामुळे सोनाली प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर ती ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘धुरळा’, ‘हिरकणी’ या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 19:34 IST
ताज्या बातम्या