scorecardresearch

“मीच त्याला प्रपोज केलं आणि…” कुणालबरोबर लग्न करण्यापूर्वी सोनाली कुलकर्णी होती ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात, स्वत:च केला खुलासा

सोनालीने तिच्या पहिल्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केले आहे.

sonalee kulkarni
सोनाली कुलकर्णी

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अर्थात सर्वांची लाडकी सोनाली कुलकर्णी ही कायमच चर्चेत असते. तिने तिच्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णी ही स्पष्टवक्ती आहे. ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल कायमच भाष्य करताना दिसते. नुकतंच सोनालीने तिच्या पहिल्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केले आहे.

सोनाली कुलकर्णीने नुकतंच एका चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या कॉलेजबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिने तिच्या पहिल्या रिलेशनबद्दलही सांगितले आहे. विशेष म्हणजे ती त्या व्यक्तीबरोबर ५ वर्ष रिलेशनमध्ये होती, असा खुलासाही तिने केला आहे.
आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

“मी कॉलेजमध्ये असताना माझ्या एका सिनियरला प्रपोज केलं होतं. त्यावेळी मला असं वाटलं होतं की तो मला प्रपोज करेल पण त्याने मला प्रपोज केलं नाही. त्यामुळे मीच त्याला प्रपोज केलं. तो मला हो म्हणाला. आम्ही फार वेळ एकत्र घालवला होता. मी आणि तो पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो.

ते माझं पहिलं रिलेशनशिप होतं, जे बराच काळ टिकलं आणि ते पहिलं सिरीयस रिलेशन होतं. पण पाच वर्षानंतर आमचा ब्रेकअप झाला”, असे सोनाली कुलकर्णी म्हणाली.

आणखी वाचा : सोनाली कुलकर्णी मालदिवमध्ये राहत असलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?

दरम्यान सोनाली कुलकर्णीने करोना काळात कुणाल बेनोडेकरबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. करोना संपल्यानंतर त्या दोघांनी अगदी थाटामाटात लग्नही केले होते. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोनाली शेअर करताना दिसते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 09:10 IST