गेल्या अनेक दशकांपासून आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजेच सोनाली कुलकर्णी. मराठीसह सोनालीने हिंदी, गुजराती, कन्नड, तमीळ, तेलगू अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोनालीने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

७० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपलं नावलौकिक केलेल्या या अभिनेत्रीने १८ व्या वर्षात आपल्या करिअरची सुरुवात केली. गिरीश कर्नाड दिग्दर्शित १९९२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चेलुवी’ या कन्नड चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मग मुक्ता, दायरा, मिशन काश्मीर, प्यार तुने क्या किया अशा अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. या सगळ्या आठवणींना उजाळा देत अभिनेत्रीने आता १९९६ सालचा तिचा एक जुना फोटो शेअर केलाय.

हेही वाचा… अदिती राव हैदरीचा जुना फोटो होतोय व्हायरल; ‘हीरामंडी’ फेम बिब्बोजानला ओळखताना होतेय नेटकऱ्यांची गफलत

सोनाली सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असते. अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच सोनालीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक जुना फोटो शेअर केलाय. या थ्रोबॅक फोटोमध्ये अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे. सोनालीचा हा ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट फोटो १९९६ सालचा आहे. टपोरे डोळे, मोठी बिंदी, खुले केस याने अभिनेत्रीचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.

या फोटोला सोनालीने कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये सोनालीने लिहिलं, “मेजर थ्रोबॅक, १९९६ इटली-व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वेळेस माझ्या इटालियन ‘फिन – द वृंदावन फिल्म स्टुडिओ’साठी हा औपचारिक फोटो काढला होता. मला फोटोग्राफरचे नाव आठवलं असतं तर बरं झालं असतं पण आता मला ते आठवत नाही.”

सोनालीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. प्रार्थना बेहेरे, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, क्रांती रेडकर, सोनाली खरे यांनी कमेंट करत तिला खूप सुंदर दिसतेयस अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा… “ओ सजनी रे…”, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांना पडली ‘लापता लेडीज’च्या गाण्याची भुरळ, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सोनाली शेवटची ‘शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट’ या चित्रपटात झळकली होती; तर ‘मुंबई डायरीज-२६/११’ या टीव्ही सीरिजचा दुसरा सीझन ऑक्टोबर २०२३ रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. या सीरिजमध्ये सोनाली कुलकर्णीने मिसेस केळकर ही भूमिका साकारली आहे.